रेल्वे मंत्रालय
कोविड-19 शी अथक लढाईदरम्यान सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने 1150 टन वैद्यकीय मालाची वाहतूक केली
देशव्यापी लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वे अविरतपणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक मालाची वाहतूक प्राधान्यक्रमाने करत आहे
लॉकडाऊन कालावधीतही विभागीय रेल्वे वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाड्यांमुळे औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांच्या वाहतूकीला वेग आला आहे
Posted On:
19 APR 2020 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2020
कोविड-19 मुळे सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वे अविरतपणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक मालाची वाहतूक प्राधान्यक्रमाने करत आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गाने दिलेले आव्हान आणि त्यामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार कसून प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना हातभार लावत, भारतीय रेल्वे औषधे, मास्क्स, रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टी तसेच इतर वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त बाबींचा पुरवठा वेळापत्रकानुसार धावणाऱ्या पार्सल विशेष रेल्वेगाड्यांमार्फत सातत्याने करत आहे.
भारतीय रेल्वेने 18.04.2020 पर्यंत देशाच्या विविध भागात 1150 टन वैद्यकीय मालाची वाहतूक केली. या वाहतूकीचे विभागवार वर्गीकरण खालीलप्रमाणे
अनु.क्र.
|
विभाग(Zone)
|
वजन (टन)
|
1
|
दक्षिण रेल्वे
|
83.13
|
2
|
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
|
15.10
|
3
|
मध्य पूर्व रेल्वे
|
1.28
|
4
|
ईशान्य रेल्वे
|
2.88
|
5
|
पूर्वी तट रेल्वे
|
1.06
|
6
|
दक्षिण मध्य रेल्वे
|
47.22
|
7
|
मध्य रेल्वे
|
135.64
|
8
|
उत्तर मध्य रेल्वे
|
74.32
|
9
|
पश्चिम मध्य रेल्वे
|
27.17
|
10
|
दक्षिण पूर्व रेल्वे
|
2.82
|
11
|
दक्षिण पश्चिम रेल्वे
|
12.10
|
12
|
पूर्व रेल्वे
|
8.52
|
13
|
पूर्वोत्तर फ्रॉन्टीयर रेल्वे
|
2.16
|
14
|
उत्तर पश्चिम रेल्वे
|
8.22
|
15
|
पश्चिमी रेल्वे
|
328.84
|
16
|
उत्तर रेल्वे
|
399.71
|
एकूण
|
1150.17 टन
|
या संकटाच्या कालखंडात भारतीय रेल्वे मानवी जीवनाचे महत्व जाणून आहे. नुकतेच एका गतीमंद (ऑटिस्टिक) लहानग्याच्या पालकांनी समाज माध्यमावरून मदतीसाठी हाक घातल्यावर त्याच्यासाठी अजमेरहून मुंबईला पार्सल रेल्वेने स्किम्ड कॅमल दुधाचा पुरवठा करण्यात आला.
तसेच अजमेरच्याच अजून एका गतीमंद (ऑटिस्टिक) आणि दुर्धर आजाराशी झुंजत असलेल्या मुलासाठीचा औषधाचा साठा संपत आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ही औषधे अहमदाबादहून अजमेरला पार्सल रेल्वेने पोचवण्यात आली.
G.Chippalkatti/V.Sahajrao/D.Rane
(Release ID: 1616104)
Visitor Counter : 243
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada