पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास’ या स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 11:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जून 2026

 

एका विशेष समारंभात, स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, "द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास" प्रदान केला.

या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल पंतप्रधानांनी स्लोव्हाकियाच्या राष्ट्राध्यक्षांसह, सरकार आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान भारताच्या 1.4 अब्ज जनतेला तसेच भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील चिरस्थायी मैत्रीच्या बंधांचा गौरव आहे, असे पंतप्रधानांनी पुरस्कार स्वीकारताना नमूद केले.

हा पुरस्कार भारत आणि स्लोव्हाकियाच्या जनतेला जोडणाऱ्या स्नेह, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हा सन्मान दोन्ही देशांतील भावी पिढ्यांना त्यांची विशेष मैत्री जोपासत राहण्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

* * *

नाना मेश्राम/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2273436) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam