माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील 'वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर'चे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन
वेव्हजच्या दालनात 51 माध्यम तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद
सर्जनशील क्षमता उभारणीसाठी आयआयसीटी एआयवर भर देत असल्याचे वैष्णव यांनी केले स्पष्ट
Posted On:
18 FEB 2026 1:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्हज क्रिएटर्स कॉर्नरचे उद्घाटन केले. पूर्णपणे कार्यरत, व्यावहारिक नवोन्मेष कार्यक्षेत्र अशा संकल्पनेनुसार, एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी) इकोसिस्टममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनात्मक उपयोजनांचे दर्शन घडेल अशारितीने या दालनाची रचना केली आहे.

वेव्ह्ज क्रिएटर्स कॉर्नर हे मंत्रालयाच्या वेव्हएक्स, वेव्ह्स बाजार आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस यासारख्या प्रमुख उपक्रमांचा आणखी धोरणात्मक विस्तार म्हणून काम करत असल्याचे उद्घाटन समारंभात मंत्र्यांनी अधोरेखित केले वैष्णव यांनी दालनात फेरफटका मारून बारकाईने पाहणी केली. तिथे त्यांनी वेव्हएक्स स्टार्टअप समुहामधील उदयोन्मुख उद्योजक तसेच अॅडोबी, नेटफ्लिक्स, सोनी आणि अमेझॉन सारख्या जागतिक संस्थांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवादही साधला.
51 स्टार्टअप्सचे काम प्रकाशझोतात
माध्यम आणि मनोरंजन इकोसिस्टमला लक्षणीय चालना देणारी बाब म्हणजे, वेव्हएक्सच्या सहाय्याने 51 आश्वासक एव्हीजीएक्स-एक्सआर आणि माध्यम तंत्रज्ञान स्टार्टअप्स या दालना एआय-संचालित उपाय आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञान सादर करत आहेत. अश्विनी वैष्णव यांनी यावेळी ज्या उद्योजकांशी संवाद साधला त्यामध्ये भाषा सेतू आणि कला सेतू स्पर्धेच्या विजेत्यांचाही समावेश होता.
श्रद्धा शर्मा यांच्यासमवेत परिसंवादात सहभाग
मंत्री महोदयांनी मीडिया लाउंजमध्ये योरस्टोरी च्या श्रद्धा शर्मा यांच्यासोबत झालेल्या एका उच्चस्तरीय परिसंवादातही भाग घेतला. या सत्रात त्यांनी एआयच्या समाजावर होणाऱ्या खोलवर परिणामाबद्दल आपले विचार मांडले तसेच तंत्रज्ञान जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्सच्या स्थापनेत ग्रामीण भारतातील प्रतिभावंतांच्या संख्येतील तफावत कशी दूर करत आहे यावरही प्रकाश टाकला.
वेव्हज क्रिएटर्स कॉर्नरमधील महत्त्वाची तांत्रिक वैशिष्ट्ये
या दालनामध्ये रिअल-टाइम गेम डेव्हलपमेंटपासून ते प्रॉम्प्ट-टू-सिनेमा लाइव्ह स्टुडिओ आणि एडब्ल्यूएसच्या एजंटिक एआयवर आधारित न्यूजरूम आणि भारतजेनने शक्य केलेल्या ऑटोमेटेड संपादकीय कामांच्या अत्याधुनिक एआय अनुभवांचे दर्शन घडविण्यात आले. या नवोन्मेषी अविष्कारांमध्ये सर्वमचे रिअल-टाइम व्हॉइस क्लोनिंग आणि बहुभाषिक संवादासाठीचे इंडस चॅट अॅप, एनएफडीसीद्वारे अत्यंत विचारपूर्वक तयार केले गेलेले 270-डिग्री एआय फिल्म स्क्रीनिंग, सोनी रिसर्च इंडियाचे फेशियल आणि व्हॉइस एजिंग तंत्रज्ञान आणि व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलने डीएसलआर किंवा आयफोनचा वापर करून मार्करविरहित टिपलेल्या हालचाली अशा गोष्टींचा समावेश होता.
क्षमता बांधणी आणि भविष्यासाठी सज्जता
विद्यार्थ्यांना उद्योगांच्या वाढत्या मागणीनुसार तयार करण्यासाठी सर्जनशील शिक्षणात एआयचा समावेश केल्याबद्दल मंत्र्यांनी आयआयसीटीचे कौतुक केले.
वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर
शिखर परिषदेच्या पूर्ण कालावधीत या व्यासपीठावर तज्ञांसोबत संवाद, चित्रपट निर्मात्यांचे मास्टरक्लास आणि जागतिक नेत्यांद्वारे तांत्रिक सत्रे सुरू राहतील.
* * *
नितीन फुल्लुके/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229519)
अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein:
Malayalam
,
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada