माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सरकारकडून 2,539.61 कोटी रुपयांची प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास योजना, एचडी वाहिन्या, वेव्हज ओटीटी आणि आशय सुधारणा यांद्वारे दूरदर्शन आणि आकाशवाणीचे आधुनिकीकरण
महाकुंभ 2025 ते इस्रोची प्रक्षेपणे : दूरदर्शन आणि आकाशवाणीची थेट प्रक्षेपणाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोच
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
वाढत्या स्पर्धात्मक प्रसारण वातावरणात दूरदर्शन आणि आकाशवाणीचे कामकाज आणि प्रेक्षकवर्ग अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यपूर्ण उपाययोजना करत आहे.
कार्यक्रमांची आशय गुणवत्ता आणि विविधता सुधारण्यासाठी, व्यापक सहभाग आणि कार्यक्रम वेगाने मिळवणे सक्षम व्हावे, यासाठी 2024 मध्ये एक सुलभ आशय सोर्सिंग धोरण सादर करण्यात आले.
नियमितपणे नवीन कार्यक्रम सुरू केले जातात आणि प्रादेशिक आणि राज्य केंद्रांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये आशय निर्मिती करण्यासाठी स्थानिक कलाकारांना संधी दिली जाते. अधिक चांगल्या प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी आणि दूरदर्शनच्या 66 कार्यक्रम निर्मिती केंद्रांमध्ये दर्जेदार स्थानिक आशयाला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकार आणि नैमित्तिक कर्मचारी दरदेखील (आर्टिस्ट अँड कॅज्युअल असाईनी रेट्स) सुधारण्यात आले आहेत.
व्यापक जनसंपर्क सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण नियमितपणे केले जाते. महाकुंभ 2025 (प्रयागराज), वेव्हज 2025 (मुंबई) आणि इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणांसारखी काही उदाहरणे यात समाविष्ट आहेत.
तांत्रिक आधुनिकीकरणामध्ये अनेक दूरदर्शन वाहिन्यांचे हाय डेफिनेशन (एचडी ) मध्ये प्रक्षेपण करणे आणि 'वेव्हज' ओटीटी मंचाच्या माध्यमातून डिजिटल उपस्थिती बळकट करणे यांचा समावेश आहे. दूरदर्शन आणि इतर वाहिन्या 'वेव्हज' ओटीटी, ऑनलाइन न्यूजऑनएआयआर (NewsONAIR) मोबाइल ॲप इत्यादींवर एकात्मिक करण्यात आल्या आहेत.
आकाशवाणीने 'द आकाशवाणी पॉडकास्ट' आणि 'आकाशवाणी ओरिजिनल्स' नावाच्या दृकश्राव्य पॉडकास्ट मालिकादेखील सुरू केल्या आहेत.
आकाशवाणीमध्ये संरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत, यात क्लस्टर प्रमुख/कार्यालय प्रमुखांसाठी निश्चित भूमिका, महसूल निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे, आशय सुधारणा आणि बाजारपेठेत पोहोच वाढवणे यांचा समावेश आहे.
अॅप्स, ओटीटी आणि सोशल मीडियासारख्या पर्यायी प्रसारण माध्यमांचा वापर केला जात आहे, ज्याला क्रॉस-चॅनल प्रसिद्धी आणि समन्वित विपणन प्रयत्नांचे पाठबळ आहे.
रुपये 2,539.61 कोटी खर्चासह प्रसारण पायाभूत सुविधा आणि नेटवर्क विकास ( BIND) योजना (2021-26) अंतर्गत प्रसारभारतीचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण हाती घेण्यात आले आहे.
यामध्ये डिजिटायझेशन, जुन्या प्रणाली बदलणे, स्टुडिओ आणि ट्रान्समीटर अद्ययावत करणे, व्याप्ती वाढवणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
महसूल आणखी वाढवण्यासाठीच्या उपायांमध्ये सुधारित ग्राहक संवाद, महसूल-केंद्रित आशय नियोजन, मल्टी-प्लॅटफॉर्म प्रसिद्धी आणि एकात्मिक जाहिरात धोरणांचा समावेश आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनने 2022–25 या कालावधीत, बिगर सरकारी जाहिरातीतून एकूण 587.78 कोटी रुपयांचा महसूल मिळवला.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी 17.12.25 रोजी लोकसभेत परशोत्तमभाई रूपाला यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2206036)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada