पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताने 2030 मध्ये होणाऱ्‍या शतकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमानपदाची बोली जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले राष्‍ट्राचे अभिनंदन

Posted On: 26 NOV 2025 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 मध्ये शतकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

ही कामगिरी म्हणजे भारताची सामूहिक वचनबद्धता आणि क्रीडा वृत्तीचे प्रतिबिंब आहे. भारताने जागतिक क्रीडा नकाशावर आपले ठळक स्थान निर्माण केल्यामुळे क्रीडा स्पर्धा आयोजनाची संधी मिळत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे:

“भारताने शतकी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळवली, याचा अत्यानंद झाला!

भारतीय जनता आणि संपूर्ण क्रीडा परिसंस्थेचे अभिनंदन. आपली सामूहिक बांधिलकी आणि क्रीडा वृत्तीनेच भारताला जागतिक क्रीडा नकाशावर अढळ स्थान दिले आहे.

‘वसुधैव कुटुंबकम’च्या भावनेने, आम्ही ही ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरे करण्यास उत्सुक आहोत.

आम्ही जगाचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत!

https://www.commonwealthsport.com/news/4408937/commonwealth-sport-confirms-amdavad-india-as-host-of-the-2030-centenary-games

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2195073) Visitor Counter : 4