पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारताच्या विकास प्रक्रियेतील नील अर्थव्यवस्थेचे महत्त्व विषद करणारा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                19 SEP 2025 5:59PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लिहिलेला एक लेख समाज माध्यमावर सामायिक केला. नील अर्थव्यवस्था कशारितीने समृद्धी, शाश्वतता आणि राष्ट्रीय शक्ती यांचा संगम साधून भारताच्या विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेला घटक बनली आहे, याबद्दलची मांडणी या लेखात केलेली आहे. समुद्रातील साधन संपत्तीचा उपयोग करून घेण्यासोबतच, समुदायांना सक्षमीकरण, नवोन्मेषाला चालना आणि जागतिक सागरी प्रशासनात भारताच्या नेतृत्वाचे स्थान बळकट करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या सागरमाला, डीप ओशिअन मिशन आणि हरित सागर मार्गदर्शक तत्त्वे यांसारखे उपक्रम या लेखात अधोरेखित केले गेले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या X या समाज माध्यमावरील संदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला प्रतिसाद :
राज्यमंत्री @DrJitendraSingh यांनी लिहिले आहे,नील अर्थव्यवस्था ही समृद्धी, शाश्वतता आणि राष्ट्रीय शक्ती यांचा संगम साधत भारताच्या विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेला घटक बनली आहे. समुद्रातील साधन संपत्तीचा उपयोग करून घेण्यासोबतच, समुदायांना सक्षमीकरण, नवोन्मेषाला चालना आणि जागतिक सागरी प्रशासनात भारताच्या नेतृत्वाचे स्थान बळकट करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या सागरमाला, डीप ओशिअन मिशन आणि हरित सागर मार्गदर्शक तत्त्वे यांसारखे उपक्रम त्यांनी अधोरेखित केले आहेत. 
 
 
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2168605)
                Visitor Counter : 9
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali-TR 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam