पंतप्रधान कार्यालय

आसाममध्ये चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या समुदायाच्या  मेहनतीचे पंतप्रधानांनी केले कौतुक


चहाच्या बागांना भेट देण्याचे पर्यटकांना केले आवाहन

Posted On: 09 MAR 2024 2:15PM by PIB Mumbai

 

आसामच्या चहाने जगभर आपले स्थान निर्माण केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या समुदायाच्या  जिद्द आणि कठोर परिश्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"आसाम  भव्य चहाच्या बागांसाठी ओळखला जातो आणि आसाम चहाने जगभर आपले स्थान निर्माण केले आहे.

अथक परिश्रम करणाऱ्या आणि जगभरात आसामची प्रतिष्ठा वाढवणाऱ्याचहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या समुदायाचे मी कौतुक करू इच्छितो.

आसाममध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मी या  चहाच्या बागांना भेट देण्याचे आवाहन करतो.

***

S.Kakade/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013011) Visitor Counter : 59