पंतप्रधान कार्यालय
भगवान बुद्धांच्या आदर्शांचा पंतप्रधानांनी केला गुणगौरव
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2024 12:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2024
बँकॉक येथे 23 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 या कालावधीत थायलंडमधील लाखो भाविकांनी भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य अर्हंत सारीपुत्तं आणि अर्हंत महा मोगल्लान यांच्या पवित्र अवशेषांना नमन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगवान बुद्धांच्या आदर्शांचा गुणगौरव केला.
चियांग माई, उबोन रत्चथानी आणि क्राबी येथे येत्या काही काळात अवशेष प्रतिष्ठापित केले जातील त्यांचेही दर्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी भक्तांना केले.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
"भगवान बुद्धांचे आदर्श भारत आणि थायलंड यांच्यातील आध्यात्मिक सेतू आहे. उभयतांमधील खोलवर रुजलेल्या संबंधात यामुळे वृद्धि होते. अनुयायांना आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध अनुभव मिळाल्याचा मला आनंद आहे आणि चियांग माई, उबोन रत्चथानी तसेच क्राबी येथे येत्या काही काळात अवशेष प्रतिष्ठापित केले जातील त्यांचेही दर्शन घ्यावे असे आवाहन मी अनुयायांना करतो.
* * *
NM/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2011533)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam