पंतप्रधान कार्यालय

विकसित आणि आत्मनिर्भर भारत एकत्रितपणे घडवूया, सचिन तेंडुलकर यांच्या काश्मीर दौऱ्याविषयी पंतप्रधानांचे भाष्य

Posted On: 28 FEB 2024 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2024

 

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या काश्मीर भेटीचा तपशील सामायिक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी X वर  पोस्ट केले आहे :

"दौऱ्याबाबत जाणून घेणे खूप सुखावह आहे! जम्मू आणि काश्मीरला तेंडुलकर यांनी दिलेल्या सुखद भेटीने युवकांपर्यंत दोन महत्त्वाचे संदेश पोहोचवले आहेत:

एक - #IncredibleIndia च्या वेगवेगळ्या भागांना भेट देऊन त्यांची ओळख करून घेणे

दोन- ‘मेक इन इंडिया’चे महत्त्व.

चला मिळून विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करूया!”

 

* * *

S.Kane/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2009808) Visitor Counter : 57