पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अनेक दशकांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सांघिक घोडेस्वारीच्या स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

Posted On: 26 SEP 2023 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

चीनमध्ये हांगचाऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धा 2022 मध्ये सांघिक घोडेस्वारीच्या स्पर्धेत 41 वर्षांच्या कालावधीनंतर सुवर्णपदक मिळवलेल्या हृदय छेडा, अनुश आगरवाला, सुदिप्ती हाजेला आणि दिव्यक्रीत सिंग यांच्या संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एक्स मंचावर पंतप्रधान लिहितात;

अनेक दशकांच्या कालावधीनंतर आपल्या घोडेस्वार पथकाने आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे!

हृदय छेडा, अनुश आगरवाला, सुदिप्ती हाजेला आणि दिव्यक्रीत सिंग या सर्वानीच अतुलनीय कौशल्य तसेच सांघिक कृतीचे दर्शन घडवले आणि आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली.

या ऐतिहासिक कामगिरीसाठी मी या संघाचे हार्दिक अभिनंदन करतो.

  

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1960932)