पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पहिल्या सुवर्ण पदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय नेमबाजांचे कौतुक
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2023 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल 10 मीटर एअर रायफल पुरुष संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले,
"आपल्या 10 मीटर एअर रायफल पुरूष संघातील नेमबाज, रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश पनवार आणि ऐश्वर्य प्रताप तोमर यांनी विलक्षण कामगिरी करत आणि जागतिक विक्रम मोडीत काढत खरोखरच विस्मयकारकपणे सुवर्णपदक जिंकले आहे."
आपल्या अद्भुत कौशल्याचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन केल्याबद्दल विजेत्यांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आणि विजेत्यांनी नवीन शिखरे गाठत राहावे अशा शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1960502)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam