मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय मंत्रिमंडळाची BSNL साठी 4G/5G स्पेक्ट्रम वाटपाला मंजुरी


एकूण 89,047 कोटी रुपयांच्या तिसऱ्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी

बीएसएनएल च्या अधिकृत भांडवलामध्ये रु. 1,50,000 कोटींवरून रु. 2,10,000 कोटी इतकी वाढ अपेक्षित

Posted On: 07 JUN 2023 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुनरुज्जीवन धोरणाचा एक भाग म्हणून, बीएसएनएल (BSNL) साठी एकूण 89,047 कोटी रुपयांच्या तिसऱ्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली. बीएसएनएल साठी समभाग उभारणी द्वारे 4G/5G स्पेक्ट्रम वाटपाचा यात समावेश आहे.

बीएसएनएल च्या अधिकृत भांडवलामध्ये रु. 1,50,000 लाख कोटींवरून रु. 2,10,000 लाख कोटी इतकी वाढ होईल. 

या पुनरुज्जीवन पॅकेजमुळे, बीएसएनएल हा भारतातील दुर्गम भागांना कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक स्थिर दूरसंचार सेवा पुरवठादार म्हणून उदयाला येईल.

स्पेक्ट्रमचे तपशील पुढील प्रमाणे:

Band

Spectrum allotted

Budgetary support

700 MHz

10 MHz paired in 22 LSAs

Rs. 46,338.60 Cr

3300 MHz

70 MHz in 22 LSAs

Rs. 26,184.20 Cr

26 GHz

800 MHz in 21 LSAs and 650 MHz in 1 LSA

Rs.   6,564.93 Cr

2500 MHz

20 MHz in 6 LSAs and 10 MHz in 2 LSAs

Rs.   9,428.20 Cr

 

Miscellaneous items

Rs.      531.89 Cr

Total

Rs.  89,047.82 Cr

स्पेक्ट्रम वाटपामुळे बीएसएनएल पुढील सेवा पुरवू शकेल:

 1. भारतभर 4G आणि 5G सेवेचे जाळे
 2. ग्रामीण भागात आणि विविध कनेक्टिविटी प्रकल्पांमधून वगळल्या गेलेल्या गावांपर्यंत 4G सेवा पोहोचणार
 3. हाय-स्पीड इंटरनेटसाठी फिक्स्ड वायरलेस ऍक्सेस (FWA) सेवा
 4. कॅप्टिव्ह नॉन-पब्लिक नेटवर्क (CNPC) साठी सेवा/स्पेक्ट्रम

बीएसएनएल/एमटीएनएल चे पुनरुज्जीवन

 • सरकारने 2019 मध्ये बीएसएनएल/एमटीएनएल साठी 69,000 कोटी रुपयांचे पहिले पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले होते. त्याने बीएसएनएल/एमटीएनएल मध्ये स्थैर्य आणले.
 • सरकारने 2022 मध्ये बीएसएनएल/एमटीएनएल साठी 1.64 लाख कोटी रुपयांचे दुसरे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले. त्याने कॅपेक्स, ग्रामीण लँडलाईनसाठी व्यवहार्यता तफावत निधी, ताळेबंद कमी करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि एजीआर थकबाकीची पूर्तता, बीबीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण, इत्यादींसाठी अर्थसहाय्य पुरवले.
 • या दोन पॅकेज मुळे, आर्थिक वर्ष 2021-22 पासून बीएसएनएलच्या कार्यान्वयनामधून  नफा मिळू लागला. बीएसएनएल  चे एकूण कर्ज रु. 32,944 कोटी वरून, रु. 22,289 कोटी इतके कमी झाले.
 • बीएसएनएल चे आर्थिक मुद्दे पुढील प्रमाणे:

FY 2020-21

FY 2021-22

FY 2022-23

Revenue

18,595 Cr

19,053 Cr

20,699 Cr

Operating profit

1,177 Cr

944 Cr

1,559 Cr

 • बीएसएनएलने देशभरात फायबर नेटवर्कच्या जाळ्यात (होम फायबर) मोठी वाढ नोंदवली असून, दर महिन्याला 1 लाखाहून अधिक नवीन जोडण्या दिल्या जात आहेत. मे 2023 मधील बीएसएनएल ची एकूण होम फायबर ग्राहक संख्या 30.88 लाख इतकी आहे. गेल्या वर्षी होम फायबरमधून एकूण रु. 2,071 कोटी महसूल प्राप्त झाला.

स्वदेशी 4G/5G तंत्रज्ञान

 • दूरसंचार तंत्रज्ञान हे एक धोरणात्मक तंत्रज्ञान असून, जगातील मर्यादित प्रदाते ग्राहकांना  हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवतात.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर’ दृष्टीकोना अंतर्गत, भारताची स्वतःची 4G/5G तंत्रज्ञान प्रणाली यशस्वीपणे विकसित करण्यात आली आहे.
 • तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. काही महिने फील्ड वरील (प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी) अंमलबजावणीनंतर बीएसएनएल नेटवर्क द्वारे ते देशभरात वेगाने पोहोचवले जाईल.

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1930528) Visitor Counter : 125