पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील क्षणचित्रे केली सामायिक
व्याघ्र संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मेहनतीला दिली दाद
Posted On:
09 APR 2023 11:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2023
पंतप्रधानांनी बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या आपल्या भेटीतील महत्वपूर्ण क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधानांनी सर्व वन अधिकारी,वन रक्षक, व्याघ्र प्रकल्पातील आघाडीचे कर्मचारी आणि व्याघ्र संवर्धनावर काम करणाऱ्या सर्वांच्या मेहनतीला दाद दिली आहे.
ट्विटच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"फुलांच्या आणि प्राण्यांच्या वैविध्यपूर्ण सानिध्यामधला एक विशेष दिवस आणि वाघांच्या संख्येबद्दल चांगली बातमी... ही आजची काही महत्वपूर्ण क्षणचित्रे आहेत."
“बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना एक संस्मरणीय भेट देत असताना मी सर्व वन अधिकारी,वन रक्षक, व्याघ्र प्रकल्पाचे आघाडीवरचे कर्मचारी आणि व्याघ्र संवर्धनावर काम करणार्या प्रत्येकाच्या मेहनतीला दाद देऊ इच्छितो. त्यांची आवड आणि प्रयत्न यांचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ”
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1915281)
Visitor Counter : 196
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam