पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आपल्या नुकत्याच कर्नाटकातील मंड्या येथील भेटीची क्षणचित्रे सामायिक केली.
कर्नाटक हे विकासाचे पॉवरहाऊस असून, देशाच्या अनेक क्षेत्रात योगदान देत आहे: पंतप्रधान
Posted On:
13 MAR 2023 11:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नुकत्याच कर्नाटकातील मंड्या येथे दिलेल्या भेटीची झलक सामायिक केली असून मंड्या हे आश्चर्यकारक शहर असल्याचे म्हटले आहे. येथील लोकांची आपुलकी सदैव जपली जाईल, असेही ते म्हणाले.
मंड्या, कर्नाटक येथील खासदार सुमलता अंबरीश यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले;
"मंड्या अप्रतिम आहे! लोकांची आपुलकी नेहमीच जपली जाईल."
रंगराज बिंदीगणविले या नागरिकाच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"कर्नाटक हे विकासाचे पॉवरहाऊस आहे, अनेक क्षेत्रात देशासाठी योगदान देत आहे. या महान राज्यातील लोकांची सेवा करणे हा सन्मान आहे."
***
SRT/S.Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1906276)
अभ्यागत कक्ष : 222
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada