पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दूध महासंघाच्या जागतिक दुग्धव्यवसाय शिखर परिषद 2022 चे उद्घाटन करणार
Posted On:
10 SEP 2022 10:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दूध महासंघाच्या जागतिक दुग्धव्यवसाय शिखर परिषद 2022 चे उद्घाटन करणार आहेत.
12 ते 15 सप्टेंबर या कालावधीत होणारी ही चार दिवसीय जागतिक दुग्धव्यवसाय शिखर परिषद म्हणजे जगभरातील आणि भारतातील दुग्धव्यवसायाशी संबंधित हितधारकांचे एक संमेलन आहे ज्यात उद्योजक , तज्ञ, शेतकरी आणि धोरणकर्ते यांचा समावेश आहे . 'पोषण आणि उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय ' ही या परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत 50 देशांतील सुमारे 1500 जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारची शेवटची शिखर परिषद सुमारे पन्नास वर्षांपूर्वी 1974 मध्ये भारतात झाली होती.
भारतीय दुग्धव्यवसाय हा छोट्या आणि अल्पभूधारक दूध उत्पादक शेतकऱ्यांना, विशेषतः महिलांना सक्षम बनवणाऱ्या सहकार मॉडेलवर आधारित असल्यामुळे अद्वितीय असा आहे . पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार, सरकारने दुग्धव्यवसाय क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिणामी गेल्या आठ वर्षांत दूध उत्पादनात 44% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा सुमारे 23% वाटा असून दरवर्षी सुमारे 210 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते आणि 8 कोटी पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकर्यांना सक्षम बनवणाऱ्या भारतीय दूध उद्योगाची यशोगाथा जागतिक दुग्धव्यवसाय शिखर परिषद 2022 मध्ये सर्वांसमोर सादर केली जाणार आहे. ही शिखर परिषद भारतीय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जगातील सर्वोत्तम पद्धती जाणून घेण्यात मदत करेल.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858372)
Visitor Counter : 233
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam