पंतप्रधान कार्यालय

भूकंपापश्चात कच्छच्या विकासाबद्दलचा व्हिडिओ पंतप्रधानांनी सामायिक केला

Posted On: 28 AUG 2022 1:26PM by PIB Mumbai

 

गुजरातमधील कच्छला 2001 मध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. त्यानंतर कच्छचा कसा विकास झाला आहे आणि कच्छ जिल्हा हा उद्योग, कृषी, पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये भरभराटीचे केंद्र म्हणून कसे विकसित होत आहे, याबद्दलचा एक व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. मोदी स्टोरी या ट्विटर हँडलकडून एका ट्विट संदेशात हा व्हिडिओ जारी केला असून त्यात स्वतः नरेंद्र मोदी हेच मुख्यमंत्री असताना त्यांनी भूकंपानंतर कसे लक्षणीय काम केले होते, याबद्दल लोकांनी चर्चा करतानाचा हा व्हिडिओ आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कच्छमध्ये कशा सुधारणा घडवून आणल्या, याबद्दल लोकांनी मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, 2001 च्या भूकंपानंतर, काही लोकांनी कच्छला अगदी निकालात काढले होते. त्यांनी म्हटले होते की आता कच्छचा विकास कधीच होऊ शकणार नाही. पण या टीकाकारांनी कच्छच्या जिद्दीला कमी लेखले होते.

अल्पावधीतच, कच्छ पुन्हा उभा राहिला आणि आज तो सर्वाधिक गतीने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा झाला आहे.

***

S.Tupe/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1855006) Visitor Counter : 187