पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उज्ज्वला अनुदानासंदर्भातला आजचा निर्णय कौटुंबिक खर्चाचा भार मोठ्या प्रमाणात हलका करेल : पंतप्रधान


Posted On: 21 MAY 2022 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मे 2022

 

पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली लक्षणीय घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल, देशाच्या नागरिकांना दिलासा देईल : पंतप्रधान  

उज्ज्वला अनुदानासंदर्भातला  आजचा निर्णय तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांनी या निर्णयाबाबत केलेल्या ट्वीटचा उल्लेख करून पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“आमच्यासाठी नेहमीच जनता सर्वप्रथम असते!”

आजचे निर्णय, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये लक्षणीय घट करण्यासंदर्भातला  निर्णय विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल, देशाच्या नागरिकांना दिलासा देईल आणि त्यांचे जगणे आणखी सुलभ करेल.   

“उज्ज्वला योजनेचा फायदा कोट्यवधी भारतीयांना, विशेषतः महिलांना झाला आहे. उज्ज्वला अनुदाना संदर्भातला आजचा निर्णय कौटुंबिक खर्चाचा भार  मोठ्या प्रमाणात  हलका  करेल.”

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827249) Visitor Counter : 264