पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. देवेंद्र पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 05 APR 2022 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022 

 

प्रख्यात कर्करोग - शल्यविशारद  डॉ. देवेंद्र पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.आरोग्य पायाभूत सुविधा आणि कर्करोगावरील  उपचाराला चालना देण्यासाठी डॉ. पटेल यांच्या योगदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"डॉ. देवेंद्र पटेल यांनी आरोग्य पायाभूत सुविधा आणि कर्करोग उपचाराला चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे असंख्य लोकांचा आदर आणि सदिच्छा प्राप्त केल्या. त्यांचे वैद्यकशास्त्राचे सखोल ज्ञान आणि करुणामय  स्वभाव सदैव स्मरणात राहील.त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रति  शोकसंवेदना . ओम शांती."

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1813742) अभ्यागत कक्ष : 215