आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड कंपनीच्या तीन प्रकल्पांसाठी नवीन गुंतवणूक धोरण-2012 लागू करण्याच्या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 22 MAR 2022 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मार्च 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रीमंडळ समितीने हिंदुस्तान उर्वरक आणि रसायने लिमिटेड कंपनीच्या गोरखपूर, सिंदरी आणि बरौनी येथील प्रकल्पांसाठी नवीन गुंतवणूक धोरण- 2022 लागू करण्याच्या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. 

15 जून 2016 रोजी स्थापन झालेली एचयूआरएल अर्थात हिंदुस्तान उर्वरक आणि रसायने लिमिटेड  ही कंपनी म्हणजे कोल इंडिया मर्या., एनटीपीसी आणि आयओसीएल अर्थात भारतीय तेल महामंडळ यांनी संयुक्तपणे उभारली  आहे. एचयूआरएल ही कंपनी एफसीआयएलचे गोरखपूर आणि सिंदरी येथील प्रकल्प तसेच जीएफसीएलचा बरौनी येथील वायू आधारित  युरिया उत्पादन  प्रकल्प पुनरुज्जीवित करत असून  या  प्रकल्पाची  स्थापित क्षमता दर वर्षी प्रत्येकी 12.7 लाख टन  इतकी आहे .एचयूआरएलच्या या तीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण 25.120 कोटी रुपये खर्च येणार आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी जीएआयएलतर्फे नैसर्गिक वायू पुरवठा होणार आहे.

युरिया निर्मिती क्षेत्रात देशाला स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने एससीआयए/एचएफसीएल यांच्या बंद पडलेल्या युरिया उत्पादन प्रकल्पांना पुनर्जीवित करण्याच्या केंद्र सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून एचयूआरएलतर्फे हे आधुनिक प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या तीन प्रकल्पांमध्ये युरिया उत्पादन सुरु झाल्यानंतर देशातील युरिया उत्पादनात दर वर्षी 38.1 लाख मेट्रिक टन युरियाची भर पडेल आणि त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला युरिया उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल. या प्रकल्पांमुळे,देशातील शेतकऱ्यांसाठी युरियाच्या उपलब्धतेत सुधारणा तर होईल, पण त्याचबरोबर रस्ते, रेल्वेमार्ग, सहाय्यक उद्योग इत्यादींच्या पायाभूत सुविधा विकासासह त्या प्रदेशातील अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळेल आणि देशाच्या अन्नसुरक्षेची सुनिश्चिती होईल.

एचयूआरएलच्या या तिन्ही प्रकल्पांमध्ये, आधुनिक पद्धतीच्या डीसीएस प्रणालीसह स्फोटरोधक नियंत्रण कक्ष, आपत्कालीन स्थितीत प्रक्रिया बंद करणारी यंत्रणा आणि पर्यावरण परीक्षण प्रणालीसह विविध विशेष वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पांमधून कोणत्याही प्रकारच्या सांडपाण्याची निर्मिती होणार नाही. प्रकल्पातील सर्व यंत्रणा अत्यंत कार्यक्षम, समर्पित आणि उत्तम प्रकारे प्रशिक्षित व्यक्तींकडून हाताळली जाईल. एचयूआरएलच्या गोरखपूर येथील प्रकल्पात भारतातील सर्वात पहिले 65 मीटर लांबी आणि 2 मीटर उंची असलेले वायू-संचालित  बुलेटप्रुफ रबर डॅम उभारण्यात आले आहे. 

देशातील उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या सात राज्यांतील युरियाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने या तीन प्रकल्पात जगातील सर्वोत्तम युरिया निर्मिती तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1808210) Visitor Counter : 251