पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान उद्या 21 जानेवारीला सोमनाथ येथील शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करणार
Posted On:
20 JAN 2022 12:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 20 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सोमनाथ येथील नव्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे भाषण होईल.
दरवर्षी भारतातून तसेच परदेशातून लाखो भाविक सोमनाथ मंदिराला भेट देतात. सोमनाथ येथे सध्या परिचालनात असलेले शासकीय विश्रामगृह मंदिरापासून दूर अंतरावर असल्यामुळे बऱ्याच काळापासून नवीन शासकीय विश्रामगृहाची गरज भासत होती. 30 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून बांधण्यात आलेले हे नवे विश्रामगृह सोमनाथ मंदिरापासून जवळ आहे. या विश्रामगृहात स्वतंत्र सूट्स, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आणि डिलक्स दर्जाच्या खोल्या, बैठका घेण्याची सोय असलेला कक्ष, प्रेक्षागार इत्यादी उत्तम सोयी केलेल्या आहेत. या इमारतीच्या प्रत्येक खोलीतून समुद्र दर्शन होईल अशा प्रकारे या शासकीय विश्रामगृहातील वास्तुरचना करण्यात आली आहे.
****
MC/Sanjana/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791175)
Visitor Counter : 261
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam