पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 30 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्या कल्पना आणि सूचना मागविल्या
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2022 11:12AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 19 जानेवारी 2022
रविवार, 30 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात कोणते विषय चर्चिले जावेत याबद्दल माहिती मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांकडून त्यांच्या कल्पना तसेच सूचना मागविल्या आहेत.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“या महिन्यात 30 तारखेला वर्ष 2022 मधील पहिला ‘#MannKiBaat’ कार्यक्रम होणार आहे. मला खात्री आहे की तुमच्याकडे प्रेरणादायी जीवन कथा आणि विषय याबद्दल सांगण्यासारखे खूप काही आहे. तुमच्याकडील माहिती मायगव्ह वर किंवा नमो अॅपवर सामायिक करा. तसेच 1800-11-7800 या क्रमांकावर तुमचा संदेश रेकॉर्ड करून पाठवा.”
***
MC/Sanjana/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1790902)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
Telugu
,
Malayalam
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Kannada