पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 50 व्या विजय दिवसानिमित्त मुक्तियोद्धे , वीरांगना आणि भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण केले
Posted On:
16 DEC 2021 9:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 व्या विजय दिवसानिमित्त मुक्तियोद्धे, वीरांगना आणि भारतीय सशस्त्र दलांमधील शूरवीरांच्या अदम्य शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण केले आहे. यानिमित्त ढाका येथे राष्ट्रपतींची उपस्थिती प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्वाची असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"50 व्या विजय दिवसानिमित्त मुक्तियोद्धे , वीरांगना आणि भारतीय सशस्त्र दलांमधील शूरवीरांच्या अदम्य शौर्याचे आणि बलिदानाचे मी स्मरण करतो. आपण एकत्र येऊन जुलमी शक्तींविरुद्ध लढलो आणि त्यांचा पराभव केला. ढाका येथे राष्ट्रपतींची उपस्थिती प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्वाची आहे."
****
MC/Sushma/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1782135)
Read this release in:
Telugu
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati