पंतप्रधान कार्यालय

हेल्थगिरी पुरस्कार 2021 च्या विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 02 OCT 2021 6:12PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हेल्थगिरी पुरस्कार 2021 च्या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"मी #HealthgiriAwards21 च्या विजेत्यांचे अभिनंदन करतो. स्वच्छता किंवा आरोग्यसेवेत काम करणाऱ्या तळागाळातील कर्तृत्ववान व्यक्तींचा दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी सन्मान करणाऱ्या IndiaToday समूहाचे सुद्धा मी अभिनंदन करतो."

कोविड -19 जागतिक महामारीत कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्था मदतीस उभ्या ठाकल्या आणि त्यांनी महामारी विरुद्धचा लढा मजबूत केला.

अशा उल्लेखनीय प्रयत्नांना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी #HealthgiriAwards21 हा IndiaToday चा एक स्तुत्य प्रयत्न आहे."

***

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1760426) Visitor Counter : 215