पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

क्रिकेट कसोटीत भारतीय संघाचा विजय आणि लसीकरणातल्या कामगिरीविषयी पंतप्रधानांनी केले कौतूक

प्रविष्टि तिथि: 06 SEP 2021 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2021

 

लसीकरण मोहिमेत आणखी एकदा महत्वाचा टप्पा साध्य केल्याबद्दल तसेच क्रिकेट कसोटीतल्या विजयाबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

आज, पुन्हा एकदा आपण एक कोटी लसींच्या मात्रा  दिल्या, गेल्या 11 दिवसांत तिसऱ्यांदा भारताने ही कामगिरी केली आहे.

क्रिकेटमध्ये देखील आज भारताने ओव्हल मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

“(पुन्हा एकदा) भारतात, लसीकरण मोहिमेसाठी महत्वाचा दिवस आणि क्रिकेटच्या मैदानावरही ! नेहमीप्रमाणेच # टीम इंडियाचा विजय!

#सबको व्हाक्सीन मुफ्त  व्हाक्सीन " असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1752687) आगंतुक पटल : 270
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam