पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नैरोबी येथे झालेल्या 20 वर्षांखालील क्रीडापटूंच्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले

Posted On: 23 AUG 2021 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड अथलेटिक्स अंडर 20 नैरोबी-2021 अर्थात नैरोबी येथे यावर्षी झालेल्या 20 वर्षांखालील क्रीडापटूंच्या जागतिक स्पर्धेत पदक मिळविल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले; 

“आपले खेळाडू वेग आणि यश मिळवत आहेत ! वर्ल्ड अथलेटिक्स अंडर 20 नैरोबी-2021 या स्पर्धेत भारताला 2 रौप्य पदके आणि एक कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल आपल्या क्रीडापटूंचे अभिनंदन!मैदानी क्रीडा प्रकारांना भारतात अधिकाधिक लोकप्रियता मिळत आहे आणि हे येत्या काळासाठीचे सुचिन्ह आहे. आपल्या  मेहनती क्रीडापटूंना शुभेच्छा.”

 

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748248) Visitor Counter : 252