पंतप्रधान कार्यालय

5 जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार

Posted On: 04 JUN 2021 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला  5 जून 2021 रोजी  सकाळी 11 वाजता दूरसंवाद पद्धतीने संबोधित करतील.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन' ही या वर्षीची मुख्य कल्पना आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 'वर्ष 2020 ते 2025 मध्ये भारतात इथेनॉल मिश्रण आखणी संदर्भात तज्ञ समितीचा अहवाल' या अहवालाचे अनावरण होईल.

जागतिक पर्यावरण दिनाच्या स्मरणार्थ भारत सरकार E-20 नोटिफिकेशन द्वारे   इंधन कंपन्यांना 1 एप्रिल 2023 पासून 20 टक्के इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विक्रीचे  तसेच BIS निर्देशांना अनुसरून  अधिक इथेनॉल मिश्रणासाठी E12 व E15 निर्देश जारी करणार आहे.

यामुळे इथेनॉल गाळण्यासाठी अधिक डिस्टीलेशन सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न होतील आणि देशभरात इथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध होईल. या मुळे वर्ष 2025 पर्यंत इथेनॉल निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये तसेच त्यांच्या जवळपासच्या विभागांमध्ये  इथेनॉलचा खप वाढण्यास मदत होईल.

पंतप्रधान पुण्यात तीन ठिकाणी उभारलेल्या E 100 वाटप स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि  कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प यांचे निर्माते शेतकरी यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी पंतप्रधान शेतकऱ्यांशी चर्चा करतील.

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724583) Visitor Counter : 282