PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
27 MAY 2021 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 27 मे 2021
- Recoveries continue to outnumber new cases for 14th consecutive day
- Recovery rate increases to 90.01%
- Daily positivity rate at 9.79%, less than 10% for 3 consecutive days
- 20.27 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
- No disruption of oxygen supply took place due to Cyclone Yaas
- Highest single day load of 1195 MT Oxygen relief to the Nation delivered by Oxygen Expresses
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 24,19,907 पोहचली
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत 75,684 इतकी घट
दैनंदिन रुग्णसंख्या 2.11 लाख असून, नवे रुग्ण कमी होण्याचा कल कायम
देशात आतापर्यंत एकूण 2,46,33,951 जण बरे झाले; गेल्या 24 तासात 2,83,135 जण बरे झाले
सलग 14 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
बरे होण्याचा दर वाढून 90.01% वर पोहचला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 10.93%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 9.79% असून सलग तिसऱ्या दिवशी तो 10% पेक्षा कमी
देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 20.27 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या
लसींच्या 20 कोटी मात्रा देणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे
चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते असून गेल्या 24 तासात 21.57 लाख चाचण्या करण्यात आल्या
इतर अपडेटस्
- भारताच्या कोविड -19 लसीकरण कार्यक्रमाबाबत अनेक भ्रामक कल्पना सध्या कानावर येत आहेत. खोटी विधाने, अर्धसत्ये आणि खोटी माहिती याचा हा परिपाक आहे. नीती आयोगातील सदस्य (आरोग्य) आणि कोविड- 19 प्रतिबंधक लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटाचे (एनईजीव्हीएसी) अध्यक्ष डॉ. विनोद पॉल यांनी या मिथकांचे निराकरण केले आणि या सर्व मुद्दय़ांवर वास्तविक माहिती दिली.
- केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत स्वरुपात तसेच राज्यांकडून थेट खरेदीच्या माध्यमातून अशा दोन्ही मार्गांनी मिळून कोविड प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत एकूण 22 कोटींहून अधिक (22,16,11,940) मात्रांचा पुरवठा केला आहे. यापैकी वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 20,17,59,768 मात्रा वापरण्यात आल्या. (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार)
- 27 एप्रिल 2021 पासून 26 मे, 2021 पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे एकूण, 18,006 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स,19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स,19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्र,14,514 व्हेंटिलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीव्हीरच्या सुमारे 7 लाख कुप्या, फेवीपिरावीर औषधाच्या सुमारे 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना करण्यात आल्या आहेत. 25/26 मे, 2021 रोजी सिंगापूर, ब्रुनेई, ओमान, ओन्टारियो (कॅनडा), इजिप्त, सिंगापूर रेडक्रॉस सोसायटी, सेवा इंटरनॅशनल (ऑस्ट्रेलिया), स्वीस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स, भारतीय व्यापार मंच (हॉंगकाँग) आणि फोक्सवॅगन (जर्मनी) यांच्याकडून मुख्य वस्तू प्राप्त झाल्या.
- वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी घराजवळील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांसंदर्भात (एनएचसीव्हीसी) राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी शिफारस कोविड -19 लसीकरणासाठीच्या राष्ट्रीय तज्ञ गटाने केंद्रीय मंत्रालयाच्या तांत्रिक तज्ञ समितीच्या प्रस्तावावर केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या मार्गदर्शक सूचना स्वीकारल्या आहेत. वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी समुदायाधारित, सुलभ आणि लोककेंद्रित दृष्टीकोनाचा अवलंब करत त्यांच्या सोयीसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रे त्यांच्या घराच्या अगदी जवळ आणली जात आहेत.
- यास चक्रीवादळाचा पोलाद निर्मिती आणि ऑक्सिजन उत्पादनावर होणारा संभाव्य परिणाम काय होईल याचं आकलन करण्यासाठी, पोलाद मंत्रालयाने 23 मे रोजी सर्व प्रमुख पोलाद उद्योजकांची, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागासोबत बैठक घेतली. ऊर्जा मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये असलेल्या उत्पादन संयंत्रांवर याचा परिणाम होणार असल्याचे समोर आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या.
- सर्व अडथळे पार करत आणि अडचणींवर नवे उपाय शोधून काढत भारतीय रेल्वेने देशभरातील अनेक राज्यांना वैद्यकीय वापराच्या द्रवरूप ऑक्सिजन (LMO) चा पुरवठा करून दिलासा दिला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने विविध राज्यांना सुमारे 1141 टँकर्सद्वारा 18,980 मेट्रिक टनांपेक्षा जास्त द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेसने अनेक राज्यांच्या मदतीसाठी आतापर्यंत 284 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत, हे दखलपात्र आहे. हे पत्रक जारी होईपर्यंत 20 टँकर्स मधून 392 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजन घेऊन आणखी 4 ऑक्सिजन एक्स्प्रेसनी आपला प्रवास सुरु केला असेल.
- मुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’ या स्टार्ट-अप कंपनीने एन-95 मास्क/पीपीई चे निर्जंतुकीकरण करण्याची प्रणाली विकसित केली असून महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली आहे. ‘वज्र कवच’ असे नाव असणारी ही निर्जंतुकीकरण प्रणाली पुनर्वापर करण्यास योग्य असे पीपीई सूट्स, वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय उपकरणे यांच्यासाठी होणारा खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरली आहे.
- एनटीपीसी, राज्य आणि जिल्हा प्रशासनाबरोबर अतिशय समन्वयाने काम करत असून दुर्गम भागातही वैदयकीय पायाभूत सुविधा उभारत आहे.या संकटाच्या काळात, एनटीपीसीच्या विविध प्रकल्पांनी 2000 औद्यागिक सिलेंडर्स जिल्हा प्रशासनाला पुरवले आहेत. त्यांना वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्सच्या रुपात परिवर्तीत केले जात आहे. कोविड रुग्णांचे जीव वाचवण्यात निर्णायक ठरणाऱ्या प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेऊन, देशभरात प्राणवायू निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात एनटीपीसी मोलाची भूमिका बजावत आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :-
कोविड --19 च्या अपेक्षित तिसर्या लाटे दरम्यान लहान मुलांना होणाऱ्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर , महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हे विशेष कृतीदल कोविड-19 च्या संक्रमणापासून मुलांचा बचाव करण्यासाठी कार्य करेल. याशिवाय उपचार, सुविधा आणि औषधे यावर मार्गदर्शन करेल. हिंदुजा रुग्णालयाचे ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू हे या कृती दलाचे प्रमुख असतील. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून कोविड -19 रुग्णांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाणही घटले आहे.बुधवारी राज्यात 24,752 नवीन रुग्णांची आणि 453 मृत्यूची नोंद झाली आहे.
गोवा अपडेट्स:-
गोव्याने कोविड 19.च्या दुसर्या लाटेचे शिखर ओलांडले आहे, असे राज्यातील साथरोग तज्ज्ञांनी म्हटले आहे.दैनंदिन रुग्णसंख्या 200 पेक्षा कमी होईपर्यंत आत्मसंतुष्टतेला जागा नसल्याचे साथरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये पहिली लाट शिखरावर पोहोचली तेव्हा राज्यात एका दिवसात 740 रुग्णांसह सर्वोच्च दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली मात्र त्या काळापासून हा आलेख खाली उतरण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला आणि नवीन दैनंदिन रुग्णांची सरासरी 200.रुग्णांच्या खाली आली.
IMPORTANT TWEETS
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona
🔸Sharing information on social media about a child found abandoned or in distress, can put the child’s life at risk.
🔸Report such information to CHILDLINE (1098) a 24 Hour Helpline for #Children in need of care and protection pic.twitter.com/dwZaAPCBmX
— PIB WCD (@PIBWCD) May 27, 2021
A message claims that people can register for #COVID19Vaccination by downloading "CowinHelp App" through the given link#PIBFactCheck: The link & app are #FAKE!
➡️https://t.co/61Oox5pH7x is the official portal to register for #COVID19 Vaccination or use UMANG & Aarogya Setu app pic.twitter.com/XGygYev9W3
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 27, 2021
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722319)
Visitor Counter : 271