रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून आजवरचा एका दिवसातला सर्वात जास्त म्हणजेच 1195 मे. टन ऑक्सिजन पुरवठा
पूर्वेकडील वादळग्रस्त भागातून अनेक अडचणींचा सामना करत ऑक्सिजन एक्स्प्रेसमार्फत आंध्र प्रदेश, सिकंदराबाद आणि तामिळनाडू मध्ये अत्यावश्यक बाबींचा पुरवठा
अनेक ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांमार्फत देशभरात 18,980 मे. टन पेक्षा जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा
284 ऑक्सिजन एक्सप्रेसमार्फत 1141 टँकर्सच्या साहाय्याने 15 राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करून दिलासा
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2021 5:47PM by PIB Mumbai
सर्व अडथळे पार करत आणि अडचणींवर नवे उपाय शोधून काढत भारतीय रेल्वेने देशभरातील अनेक राज्यांना वैद्यकीय वापराच्या द्रवरूप ऑक्सिजन (LMO) चा पुरवठा करून दिलासा दिला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने विविध राज्यांना सुमारे 1141 टँकर्सद्वारा 18,980 मेट्रिक टनांपेक्षा जास्त द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने अनेक राज्यांच्या मदतीसाठी आतापर्यंत 284 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत, हे दखलपात्र आहे.
हे पत्रक जारी होईपर्यंत 20 टँकर्स मधून 392 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजन घेऊन आणखी 4 ऑक्सिजन एक्स्प्रेसनी आपला प्रवास सुरु केला असेल.
23 मे 2021 रोजी एका दिवसात 1142 मेट्रिक टनांची विक्रमी वाहतूक केल्यानंतर आता ऑक्सिजन एक्स्प्रेसनी एका दिवसात 1195 मेट्रिक टन ऑक्सिजन वाहतुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
दिल्लीत आतापर्यंत 5000 मेट्रिक टनापेक्षा जास्त द्रवरूप ऑक्सिजन (LMO) पुरवला गेला आहे.
दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांत प्रत्येकी 1000 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवठा झाला आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांमधून ऑक्सिजन वाहतुकीची सुरुवात 33 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी महाराष्ट्रासाठी 126 मेट्रिक टन ऑक्सिजन नेण्यापासून झाली.
मागणी करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळेत शक्य तितका जास्त द्रवरूप ऑक्सिजन पुरवठा करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.
देशातील उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या 15 राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
हे पत्रक जारी होइपर्यंत महाराष्ट्रात 614 मे. टन ऑक्सिजन पोचवण्यात आला असून सुमारे उत्तर प्रदेशात 3731 मे. टन, मध्य प्रदेशात 656 मे. टन, दिल्लीत 5077 मे टन., हरियाणात 1967 मे. टन, राजस्थानात 98 मे टन, कर्नाटकात 1653 मे. टन, उत्तराखंड मध्ये 320 मे. टन, तामिळनाडूत 1550 मे टन, आंध्र प्रदेशात 1190 मे. टन, पंजाबमध्ये 225 मे. टन, केरळमध्ये 380 मे. टन, तेलंगणात 1312 मे. टन, झारखंडमध्ये 38 मे. टन आणि आसाममध्ये 160 मे. टन ऑक्सिजन पुरवला गेला आहे.
रेल्वे विभागाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला गरज भासली तर तिथे तातडीने ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी जय्यत तयारी ठेवली आहे. राज्य सरकारांनी द्रवरूप ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी भारतीय रेल्वेला रिकामे टँकर्स पुरविले आहेत.
***
M.Pange/U.Raikar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1722188)
आगंतुक पटल : 320