पोलाद मंत्रालय

यास चक्रीवादळामुळे पोलाद उत्पादन किंवा ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय नाही

Posted On: 27 MAY 2021 11:54AM by PIB Mumbai

यास चक्रीवादळाचा पोलाद निर्मिती आणि ऑक्सिजन उत्पादनावर होणारा संभाव्य परिणाम काय होईल याचं आकलन करण्यासाठी, पोलाद मंत्रालयाने 23 मे रोजी सर्व प्रमुख पोलाद उद्योजकांची, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागासोबत बैठक घेतली. ऊर्जा मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये असलेल्या उत्पादन संयंत्रांवर याचा परिणाम होणार असल्याचे समोर आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या. ओडिशाच्या कलिंगनगर आणि अंगुल या संयंत्रांवर अवलंबून असलेली राज्ये  2 ते  4 दिवसांसाठी तात्पुरती टाटाच्या जमशेदपूर प्रकल्पातून बाजूला काढण्याची योजना आखण्यात आली. ओडिशामधील अंगुल, कलिंगनगर आणि राउरकेला येथे असलेल्या कोणत्याही पोलाद संयंत्रात वीज पुरवठ्यात व्यत्यय आला नाही, याची पुष्टी झालेली आहे. ओडिशामध्ये संयंत्र असलेल्या टाटा प्रतिनिधींकडून पुष्टी करण्यात आली आहे की, चक्रीवादळ यासचा टाटा पोलाद संयंत्रावर आणि द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही.

कलिंगनगर, जमशेदपूर आणि अंगुलमधील सर्व संलग्न ऑक्सिजन संयंत्रांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन पुरवठा कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता
नेहमीप्रमाणे सुरूच होता.

कलिंगनगरला जाणाऱ्या टँकरमध्ये कपात करण्यात आली  आणि तेच टँकर जमशेदपूरकडे वळविण्यात आले. हे आगामी चक्रीवादळासाठीच्या आकस्मिक योजनेनुसार करण्यात आले. दुर्गापूर, बर्नपूर आणि राउरकेला येथील  भारतीय पोलाद प्राधिकरणाची संयंत्रही सज्ज ठेवण्यात आली होती. अशाप्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठीची प्रमाणित कार्य प्रणाली सर्व संबंधित व्यक्तींना पुन्हा अवगत करण्यात आली. पोलाद उत्पादन किंवा ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आला नाही. त्याचप्रमाणे ओडिशाच्या अंगुल आणि झारसुगुडा येथील जेएसपीएल आणि जेएसडब्ल्यूच्या संयंत्रांना सज्ज ठेवण्यात आले होते आणि यास चक्रीवादला दरम्यान त्यांना कोणत्याही व्यत्ययाचा सामना करावा लागला नाही.

 

***

ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722105) Visitor Counter : 250