आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड मदतीसंदर्भात अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत, 18,006 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स,19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स,19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्र, 14,514 व्हेंटिलेटर/बायपॅप, रेमडेसीव्हीरच्या सुमारे 7 लाख कुप्या, फेवीपिरावीर औषधाच्या सुमारे 12 लाख गोळ्या त्वरेने वितरीत/रवाना
Posted On:
27 MAY 2021 3:36PM by PIB Mumbai
भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून आंतरराष्ट्रीय सहकार्या अंतर्गत विविध देशांकडून तसेच संस्थांकडून कोविड उपचारासाठी वैद्यकीय साधनसामुग्री व उपकरणे मिळत आहेत. या साधन सामुग्रीचे राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्वरित वितरण होत आहे.
27 एप्रिल, 2021 पासून 26 मे, 2021 पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे एकूण, 18,006 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स,19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स,19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्र,14,514 व्हेंटिलेटर्स/ बायपॅप, रेमडेसीव्हीरच्या सुमारे 7 लाख कुप्या, फेवीपिरावीर औषधाच्या सुमारे 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना करण्यात आल्या आहेत.
25/26 मे, 2021 रोजी सिंगापूर, ब्रुनेई, ओमान, ओन्टारियो(कॅनडा), इजिप्त, सिंगापूर रेडक्रॉस सोसायटी,सेवा इंटरनॅशनल(ऑस्ट्रेलिया), स्वीस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स, भारतीय व्यापार मंच (हॉंगकाँग) आणि फोक्सवॅगन (जर्मनी) यांच्याकडून मुख्य वस्तू प्राप्त झाल्या.
Consignments
|
Quantity
|
Oxygen Concentrators
|
155
|
Oxygen Cylinders
|
900
|
Ventilators/Bi-PAP/CPAP
|
1,045
|
या सामग्रीचे राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांना प्रभावी त्वरित वाटप आणि सुव्यवस्थित वितरण अविरत सुरूच आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमितपणे यावर व्यापक देखरेख ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात प्राप्त परदेशी कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष 26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार केली आणि अंमलात आणली.
***
S.Tupe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722134)
Visitor Counter : 278