ऊर्जा मंत्रालय

कोरोना विषाणूपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी एनटीपीसीने विस्तारली सहकार्याची व्याप्ती

Posted On: 27 MAY 2021 2:35PM by PIB Mumbai

 

देशातला उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतला एनटीपीसी हा सर्वात मोठा उद्योग समूह आहे. त्याने कोविड19 च्या काळात देशाला केवळ अखंडीत वीजपुरवठाच केला नाही तर, थेट लोकांपर्यंत पोहोचून, देशातल्या विविध भागात कोविड19 च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्याचेही काम केले आहे.

एनटीपीसीने पुढाकार घेत 600 पेक्षा अधिक ऑक्सीजन खाटा आणि 1200 विलगीकरण खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. आपल्या विविध प्रकल्पाअंतर्गत केवळ आठवड्याभरात युद्धपातळीवर काम करत ही सुविधा उभारल्याने अनेक जनसामान्यांचे प्राण वाचले आहेत. एनटीपीसी, राज्य आणि जिल्हा प्रशासनाबरोबर अतिशय समन्वयाने काम करत असून दुर्गम भागातही वैदयकीय पायाभूत सुविधा उभारत आहे.

या संकटाच्या काळात, एनटीपीसीच्या विविध प्रकल्पांनी 2000 औद्यागिक सिलेंडर्स जिल्हा प्रशासनाला पुरवले आहेत. त्यांना वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्सच्या रुपात परिवर्तीत केले जात आहे. कोविड रुग्णांचे जीव वाचवण्यात निर्णायक ठरणाऱ्या प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेऊन, देशभरात प्राणवायू निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात एनटीपीसी मोलाची भूमिका बजावत आहे.

देशभरात एनटीपीसी, 24 पेक्षा अधिक प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारत असून यात काही ठिकाणी सिलेंडर्समधे प्राणवायू भरण्याचीही सुविधा आहे. एनटीपीसी, त्यांच्या आसपासच्या लोकांना केवळ कोविडवरची अत्यावशक औषधेच पुरवत नसून, त्यांना वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करत आहे.

एनटीपीसीने आपल्या सर्व प्रकल्पातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि संबंधित घटकांचे लसीकरण केले आहे. आतापर्यंत एनटीपीसीने 70,000 जणांचे लसीकरण केले आहे. यात कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि संबंधित क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, एनटीपीसीने केवळ आपल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे 100 टक्के लसीकरण करण्याचेच ध्येय ठेवलेले नाही तर त्यांची, आसपासच्या लोकांचेही लसीकरण करण्याची योजना आहे.

एनटीपीसीने उभारलेली वैद्यकीय तसेच प्राणवायू संबंधित पायाभूत सुविधा केवळ या महामारीत उपयोगी ठरतेय असे नाही तर भविष्यातही अशा संकटाचा सामना करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722112) Visitor Counter : 239