पंतप्रधान कार्यालय
स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचे पंतप्रधान 11 मार्चला प्रकाशन करणार
प्रविष्टि तिथि:
10 MAR 2021 6:45PM by PIB Mumbai
स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्चला प्रकाशन करणार असून सकाळी 10.25 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या 5 लाख प्रतींची विक्री झाल्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्वामी चिद्भवानंदजी हे तामिळनाडूतल्या तिरुचिरापल्लीतल्या तिरुपराथुराई इथल्या श्री रामकृष्ण तपोवनम आश्रमाचे संस्थापक आहेत. स्वामीजींनी 186 पुस्तके लिहिली असून सर्व साहित्यिक रचनेत लेखन केले आहे. गीतेवर त्यांनी केलेले विद्वत्तापूर्ण लेखन हे या विषयावरच्या विस्तृत पुस्तकांपैकी एक आहे. गीतेच्या तमिळ आवृतीचे त्यांच्या टिपण्णीसह प्रकाशन 1951 मध्ये झाले. त्यानंतर 1965 मध्ये इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन झाले. अनुयायांनी तेलगु,ओरिया,जर्मन आणि जपानी भाषेत त्याचा अनुवाद केला आहे.
****
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1703915)
आगंतुक पटल : 243
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam