पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 26 फेब्रुवारीला दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी खेळांच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2021 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:50 च्या सुमाराला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी खेळांच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.
26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने जम्मू-काश्मीर क्रीडा परिषद आणि जम्मू-काश्मीरच्या हिवाळी खेळ संघटनेच्या सहकार्याने या स्पर्धा आयोजित केल्या आहे. क्रीडाप्रकारांमध्ये अल्पाइन स्कीइंग, नॉर्डिक स्की, स्नोबोर्डिंग, स्की पर्वतारोहण, आईस हॉकी, आईस स्केटिंग, आईस स्टॉक इत्यादींचा समावेश असेल. 27 राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंडळे आपले संघ या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी आपले चमू पाठवत आहेत.
* * *
S.Thakur/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1700828)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam