पंतप्रधान कार्यालय
खंड आणि विविधता ही आमच्या स्टार्ट अपची दोन मोठी वैशिष्ट्ये आहेतः पंतप्रधान मोदी
Posted On:
16 JAN 2021 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021
पंतप्रधान म्हणाले की स्टार्टअप जगताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य खंड आणि विविधतेची क्षमता आहे. ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘प्रारंभ : स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेला ’ संबोधित करत होते.
खंड अशासाठी कारण स्टार्टअप्स नवीन पध्दती, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन मार्गांना वाव देत आहेत. ते जुन्या विचारपद्धतीत बदल घडवून आणत आहेत.
विविधता कारण मोठ्या संख्येने विविध कल्पना विविध क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व प्रमाणात क्रांती घडवून आणत आहेत. ते अनेक क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहेत या परिसंस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे व्यावहारिकतेपेक्षा उत्कटतेने परिचालन केले जात आहे. भारत आज ज्या पद्धतीने कार्य करत आहे त्यातून ‘करू शकतो ’ ही भावना दिसून येते, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी भीम यूपीआयचे उदाहरण दिले, ज्याने पेमेंट व्यवस्थेत क्रांती घडवून आणली आहे. केवळ डिसेंबर 2020 मध्ये, भारतात 4 लाख कोटी रुपयांचे व्यवहार यूपीआयमार्फत झाले. त्याचप्रमाणे सौर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत आघाडीवर आहे.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689337)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam