पंतप्रधान कार्यालय

ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रकुल आणि विकास सचिव डॉमनिक राब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 16 DEC 2020 4:23PM by PIB Mumbai

 

ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रकुल आणि विकास सचिव डॉमनिक राब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे नुकत्याच झालेल्या  संभाषणाचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. कोविड पश्चात जगामध्ये भारत- ब्रिटन भागीदारीच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. द्विपक्षीय संबंधांची पुरेपूर क्षमता उपयोगात आणण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षाशिक्षणउर्जाहवामान बदल आणि आरोग्य यांच्या समावेशासह महत्वाकांक्षी आणि फलदायी पथदर्शी आराखड्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

परराष्ट्र सचिव राब यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या शुभेच्छा पंतप्रधानांना दिल्या आणि ब्रिटनने नुकत्याच सह आयोजित केलेल्या हवामान महत्वाकांक्षा शिखर  परिषदेत सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभारही मानले.

सामायिक मुल्ये, सामायिक जागतिक आव्हानांची एकत्रित दखल घेण्याची क्षमता यावर आधारित भारतासमवेतचे संबंध नव्या उंचीवर नेण्याला ब्रिटनचे प्राधान्य आहे यावर त्यांनी भर दिला.

2021 मध्ये ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G7 राष्ट्रांच्या बैठकीसाठी पंतप्रधानांना निमंत्रण देणारे बोरिस जॉन्सन यांचे पत्र राब यांनी पंतप्रधानांकडे सुपूर्द केले. पंतप्रधानांनी आभार व्यक्त करत याचा स्वीकार केला.

पुढच्या महिन्यात भारताच्या  72  व्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यात नवी दिल्लीत बोरिस जॉन्सन यांचे स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681065) Visitor Counter : 140