PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
25 NOV 2020 8:54PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 25 नोव्हेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)

#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


लोकशाही व्यवस्थेत, संवादाची माध्यमे हीच संवादाची परिणीती विसंवादात न होण्यासाठी सहाय्यक असणारी सर्वोत्तम माध्यमे आहेत, असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. ते आज (नोव्हेंबर 25, 2020) गुजरात मधील केवडिया येथे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.
ब्रिक्स देशातील क्रीडा संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची सामंजस्य करारास मान्यता
आयसीएआय अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटस् ऑफ इंडिया , नेदरलँडमधील वेरेनिगिंग व्हॅन रजिस्टर कंट्रोलर्स (व्हीआरसी) यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता
लक्ष्मी विलास बँक आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या विलिनीकरण योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या वैश्विक नवीकरणीय उर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्स्पो RE-Invest 2020 या आभासी परिषदेचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2020 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता करतील. 26 ते 28 नोव्हेंबर 2020 दरम्यान भरणार असलेल्या या परिषदेचे आयोजन अपारंपारिक आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. हे वर्ष पीठासीन अधिकारी परिषदेचे शताब्दी वर्ष म्हणून देखील साजरे केले जात आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारताने कोविड-19 निदान चाचण्यांसाठीच्या सुविधा सातत्याने वाढविल्यामुळे चाचण्यांच्या संख्येत भरभक्कम वाढ झालेली आहे.
गेल्या 24 तासात 11,59,032 चाचण्या झाल्या, आणि एकूण झालेल्या निदान चाचण्यांची संख्या 13.5 कोटींपर्यंत पोचली (13,48,41,307).
सर्वसमावेशक आणि व्यापक स्तरावर कोविड चाचण्या करण्यात येत असल्यामुळे पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे.राष्ट्रीय पातळीवर एकूण पॉझिटिव्हिटी दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कोविडच्या प्रसाराला आळा बसत आहे. एकूण पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होत असून हा दर आज 6.84% टक्के इतका आहे.
एकूण पॉझिटिव्हिटी दरात होत जाणारी घट ही देशातील कोविड चाचण्यांच्या सुविधांमध्ये व्यापक प्रमाणात वाढ झाल्याचा परिणाम आहे. आज दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.83% आहे.
देशात एकूण 2,138 निदान चाचणी केंद्रे आहेत, ज्यात 1167 सरकारी आणि 971 खाजगी चाचणी केंद्रांचा समावेश आहे. दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, भारतातील दर दशलक्षांमागील चाचण्यांची दैनंदिन संख्या ही जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेल्याहून पाच पट जास्त आहे.
भारताचा एकूण सक्रिय रुग्णसंख्या दर (4,44,746) हा एकूण बाधितांच्या संख्येच्या 4.82% आहे आणि तो सातत्याने 5%हून कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स:
गृह मंत्रालयाच्यावतीने आज दक्षता, प्रतिबंध आणि मागोवा घेण्याविषयी घेण्याविषयी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. या सूचनांची अंमलबजावणी दि. 1 डिसेंबर, 2020 पासून करण्यात येणार आहे. तसेच दि. 31 डिसेंबर, 2020 पर्यंत हे निर्देश जारी असतील.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 39 ए नुसार मोफत कायदेशीर मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या न्याय विभागाच्या वतीने न्याय बंधू अप्लिकेशनचे आयओएस व्हर्जन (आवृत्ती) आणि त्याचा उमंग प्लॅटफॉर्मवरील प्रारंभ संविधान दिनी म्हणजेच 26 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे. उमंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतभरातील सुमारे 2.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांना मोबाइल आधारित कायदेशीर सेवा सहज उपलब्ध होऊ शकेल.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीय उद्योगाला गुणवत्ता आणि उत्पादकता यांच्यामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे. विविध उद्योग संघटनांच्या कार्यालयीन अधिकारी वर्गाशी गोयल यांनी संवाद साधला.
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील आस्थापनांकडून केलेल्या खरेदी व त्यासाठी दिलेली रक्कम यांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. खरेदीत झालेला मासिक वाढ, त्याच्या परतफेडीच्या रकमेत झालेली मासिक वाढ आणि रक्कम चुकती करण्यासाठी होणाऱ्या विलंब कालावधीच्या प्रमाणात झालेली घट याचा तक्ताही प्रसिद्ध केला आहे.
महाराष्ट्र अपडेट्स:
कोविड-19 लस वितरित करण्याकरिता सर्व कार्यपद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. लस उपलब्ध होण्याबरोबरच त्यांचा प्रभाव तसेच त्यांचे दुष्परिणाम, प्रत्येक व्यक्तिमागे लसीकरणाचा खर्च, लसीचे वितरण यासंदर्भात टास्क फोर्स चर्चा करेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाव्हायरस लसीचा विकास जाणून घेण्यासाठी राज्य सरकार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी सतत संपर्कात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे संक्रमणांची संख्या जवळपास प्रति दिवस 24 हजारांवरून प्रति दिवस 5 हजारापर्यंत खाली आणण्यास मदत झाली आहे. या मोहिमेद्वारे राज्याने 11 कोटींहून अधिक व्यक्तींचा आरोग्यविषयक डेटा संकलित केला आहे. महाराष्ट्रात दररोज 80,000 कोविड -19 चाचण्या घेतल्या जात आहेत.
FACT CHECK



*******
M.Chopade/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675839)
Visitor Counter : 137