मंत्रिमंडळ
ब्रिक्स देशातील क्रीडा संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची सामंजस्य करारास मान्यता
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2020 6:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ब्रिक्स देशांशी झालेल्या क्रीडा संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.
क्रीडा क्षेत्रातील सहकार्यामुळे क्रीडा विज्ञान, क्रीडा चिकित्सा, प्रशिक्षणाचे तंत्र इत्यादी क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव विकसित होईल. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंची कामगिरी सुधारेल आणि ब्रिक्स देशांशी द्विपक्षीय संबंध दृढ होतील.
पाच देशांमधील क्रीडा क्षेत्रात सहकार्याने होणारे फायदे सर्व खेळाडूंना समान पद्धतीने लागू असतील आणि त्यांना त्यांच्यात जाती, वंश, प्रांत, धर्म आणि लिंग यांच्या आधारे कोणताही भेदभाव असणार नाही.
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1675741)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam