सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

CPSEs नी MSMEs कडून केलेली खरेदी व त्यासाठी दिलेली रक्कम यात गेल्य़ा सहा महिन्यात भरघोस वाढ


मे 2020 आणि ऑक्टोबर 2020 दरम्यान खरेदी आणि दिलेली रक्कम यामध्ये अडीच पट वाढ

मासिक खरेदीसोबत मासिक रकमेचेही वाढते प्रमाण तर मासिक थकबाकी मात्र कमी

Posted On: 24 NOV 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्‍हेंबर 2020
 


सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांनी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील आस्थापनांकडून केलेल्या खरेदी व त्यासाठी दिलेली रक्कम यांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. खरेदीत झालेला मासिक वाढ, त्याच्या परतफेडीच्या रकमेत झालेली मासिक वाढ  आणि रक्कम चुकती करण्यासाठी होणाऱ्या विलंब कालावधीच्या प्रमाणात  झालेली घट याचा तक्ताही प्रसिद्ध केला आहे. मंत्रालयाने असंही स्पष्ट केले आहे की  एकूण खरेदी किमतीच्या एक पंचमांश रक्कम अद्याप अदा करायची असून  कोणत्याही सामान्य व्यापार व्यवहाराप्रमाणेच ती  45 दिवसांच्या आत अदा केली जाईल. 

मंत्रालयाने दिलेल्या तपशीलात पुढील बाबी आहेत:
 

  • मे-2020मध्ये 25 मंत्रालय व 79 सार्वजनिक केंद्रीय उपक्रमांनी माहिती दिली असून आता ऑक्टोबर 2020 मध्ये 26 मंत्रालय विभाग आणि 100 सार्वजनिक केंद्रीय उपक्रमांनी माहिती दिली असून यात सातत्याने वाढच होत राहिल.
  • सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील आस्थापनांकडून कडून होणारा एकूण खरेदी आणि व्यवहार याच्या एकूण रकमेत मे 2020 च्या मानाने ऑक्टोबर 202मध्ये अडीचपट वाढ झाली आहे. 
  • सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील आस्थापनांना अदा होणारी रक्कमही त्याच प्रमाणात वाढती आहे. 
  • त्या सर्व महिन्यांमध्ये महिनाअखेरीस बाकी असणारी रक्कम ही एकूण खरेदी रकमेच्या एक पंचमांश असून ती उद्योग व्यवसायातील सर्वसामान्य बाब आहे. खरे तर गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रमाण कमी होत आहे        

सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांकडून खरेदीस सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रम आग्रही असतात असे गेल्या सहा महिन्यातील अनुभवावरून दिसून येते असे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने म्हटल आहे. MSME मंत्रालयाने मे 2020 नंतर समाधान पोर्टलवर माहिती मिळवण्यासाठी टाकलेल्या  नव्या प्रारुपावर माहिती देतानाही या सार्वजनिक उपक्रमांनी (CPSEs) सहकार्य दिले आहे. सार्वजनिक केंद्रीय उपक्रम आणि सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांमधील वाढत्या व्यवसायावरून या उपक्रमांचा वाढता भांडवली खर्च ही दिसून येत  आहे. याशिवाय उपक्रमांकडून उद्योगांना दिल्या जाणाऱ्या रकमेत दरमहा होणारी वाढ बघता दोघांकडील (CPSEs व MSME उद्योग ) रोकड रुपांतरण क्षमता दिसून येते. 

धाडसी धोरणे, समयोचित मध्यस्ती आणि भारत सरकारचा भक्कम आधार तसेच सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्रालयाची त्यासाठीची अखंड मोहिम व प्रयत्न यांची ही निष्पत्ती आहे. 

आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचा उत्साहवाढीला पूरक ठरले. कोविड महामारीच्या काळातही पुन्हा सुरूवात करून माल व सेवेचा पुरवठा करण्यासाठीचा आत्मविश्वास बळकट करते झाले; 

पंतप्रधानांचे व्होकल फॉर लोकल हे आवाहन एकल वा कॉर्पोरेट वापरकर्त्यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील व्यवसायांकडून खरेदीसाठी प्रोत्साहन देणारे ठरले; 

  • आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत सुक्ष्म लघू मध्यम उद्योगांना 45 दिवसांमध्ये रक्कम चुकती करण्याची पंतप्रधानांची घोषणा ही सरकारी व कॉर्पोरेट खरेदीदारांना तसेच MSE माल व सेवा खरेदीदारांसाठी उत्साहवर्धक ठरली. 
  • या घोषणेनंतर सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालयाकडून अविरत प्रयत्न करण्यात आले. 
  • संबधितांना सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवांकडून अनेकवेळा पत्रे पाठवली गेली.
  • कॅबिनेट सचिवांनीही या मंत्रालयाला सहकार्य करत सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांना पत्रे लिहीली.
  • सार्वजनिक उपक्रमांच्या (CPSEs ) प्रमुखांबरोबर  MSME विभागाच्या सचिवांनी अनेकदा व्यक्तिगत चर्चा आणि मध्यस्थी घडवून आणली.
  • सार्वजनिक उपक्रमांना खरेदी, भरणा केलेली रक्कम आणि शिल्लक रक्कम यांची मासिक नोंद करण्यासाठी सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालयाने ऑनलाईन रिपोर्टीग एप तयार केले. 
  • सुक्ष्म लघू मध्यम उद्योगांना वेळेवर रक्कम चुकती करण्यासंदर्भात सतर्क रहाण्यासाठी सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालय सचिवांनी अनेकवार  राज्यसरकारांना विनंती व तगादा लावला.
  • सुक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्रालय सचिवांनी उद्योगक्षेत्रातील बड्या कंपन्यांना कॉर्पोरेट्सना दोनवेळा ई-पत्रे पाठवली. पहिल्या वेळी 500 पत्रे पाठवली आणि उत्तम प्रतिसाद मिळाला.
  • उत्सवांच्या आधी म्हणजे दुसऱ्या वेळी  कॉर्पोरेट्सना 3000 ई-पत्रे लिहीली गेली.
  • सार्वजनिक तसेच खाजगी बड्या कंपन्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देशातील सुक्ष्म लघू मध्यम उद्योगांना सहकार्य करण्याची तयारी दाखवली. 
  • अनेक कॉर्पोरेट्सनी सांगितल्याप्रमाणे व मार्केट फीडबॅकनुसार  सणांच्या दिवसांपूर्वीच बऱ्याच कॉर्पोरेट्सनी MSME ची परतफेड केली होती. 
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सुक्ष्म लघु मध्यम क्षेत्रातील उद्योगांकडून केलेली सर्वाधिक खरेदी, सर्वाधिक व्यवहार आणि त्यांना वेळेवर अदा केलेली रक्कम यांचे तपशील सोबतच्या तक्त्यात दिसून येतील. 

या निमित्ताने सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय हे मंत्रालय विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रम आणि India Inc. यांचे सुक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्राला दिलेला मदतीचा हात तसेच भारत सरकारला दिलेले सहकार्य बद्दल आभार मानत आहे.

MSME ना थकबाकी अदा करण्याबाबत  कॉर्पोरेटसना  MSME मंत्रालयाने लिहिलेल्या पत्रांची लिंक 
 


* * *

M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675460) Visitor Counter : 190