राष्ट्रपती कार्यालय
लोकशाही व्यवस्थेत, संवादाची माध्यमे हीच संवादाची परिणीती विसंवादात न होण्यासाठी सहाय्यक असणारी सर्वोत्तम माध्यमे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपतींच्या हस्ते केवडिया येथे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्घाटन
Posted On:
25 NOV 2020 3:38PM by PIB Mumbai
लोकशाही व्यवस्थेत, संवादाची माध्यमे हीच संवादाची परिणीती विसंवादात न होण्यासाठी सहाय्यक असणारी सर्वोत्तम माध्यमे आहेत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. ते आज (नोव्हेंबर 25, 2020) गुजराथेतील केवडिया येथे 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षही महत्वाची भूमिका बजावत असतो आणि म्हणूनच सुसंवाद, सहकार्य आणि परस्परांमधील अर्थपूर्ण विचारविनिमय यांची आवश्यकता असते. संसदेत लोकप्रतिनिधींना परस्परसंवादी चर्चांसाठी नेहमीच योग्य वातावरण राखणे आणि त्यांच्यामधील चर्चा वा संवादांना प्रोत्साहन देणे ही पीठासीन अधिकाऱ्याची जबाबदारी असते ,असे त्यांनी सांगितले.
प्रामाणिकता आणि ऩ्याय हे आपल्या संसदीय व्यवस्थेच्या पायाचे दगड आहेत. सदनाच्या अध्यक्षांचे आसन हे प्रतिष्ठा आणि कर्तव्य या दोन्हीचे प्रतिक आहे. प्रामाणिकता आणि न्यायाची जाणिव ही या आसनाची मागणी असते. हे आसन भेदभावाला थारा न देणे, सदाचरण आणि न्याय यांचेही प्रतिनिधीत्व करते. पीठासिन अधिकाऱ्याचे वर्तन हे उदात्त आदर्शांपासून प्रेरित असायला हवे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
लोकांच्या कल्याणासाठी लोकशाही व्यवस्था सर्वात जास्त परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे म्हणूनच संसदेचा आणि कायदेमंडळाचा सभासद असणे ही अभिमानाची बाब आहे. लोककल्याण आणि देशाचा विकास यासाठी सभासद तसेच पिठासीन अधिकाऱ्यांनी परस्परांची प्रतिष्ठा जपली पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्यांप्रति आदर दाखवून आमदार आणि खासदारांनी स्वतःचा तसेच संसदीय लोकशाहीचा मान राखणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.
संसद आणि कायदेमंडळ हे आपल्या संसदीय व्यवस्थेचे खांब आहेत. आपल्या देशबांधवांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गेल्या काही दशकात सामान्य लोकांच्या अपेक्षा, इच्छा आणि जागृती यात वाढ झालेली आहे म्हणूनच संसद आणि लोकप्रतिनिधींची भूमिका तसेच त्यांच्यावरील जबाबदारी याला पूर्वीपेक्षा जास्त महत्व आले आहे. लोकप्रतिनिधींनी लोकशाहीच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहणे अपेक्षित आहे लोकशाही संस्था आणि लोकप्रतिनिधींसाठी सर्वात आव्हानात्मक काम कुठले असेल तर ते लोकांच्या अपेक्षांना खरे उतरणे हे होय, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले
“विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यात सुसंवाद समन्वय- जोशपूर्ण लोकशाहीची गुरुकिल्ली.” ही यंदाच्या परिषदेची संकल्पना असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती म्हणाले कीकार्यकारी मंडळ , संसद सदस्य आणि न्यायव्यवस्था ही राज्याची तीन अंगे आहेत. त्यांच्यात सुसंवाद आहे किंबहुना भारतात या परंपरेची मुळे घट्ट रुजली आहेत असे ते म्हणाले. . परिषदेच्या दरम्यान होणाऱ्या चर्चेतून निघणारे निष्कर्ष हे आपल्या लोकशाही व्यवस्थेला अधिक मजबूत करतील. लोककल्याण विशेषतः समाजातील गरीब, मागासलेले आणि वंचित यांचे कल्याण ही संसदीय लोकशाहीची मुख्य उद्दिष्टे असून राज्यव्यवस्थेची तीन अंगे सहकार्याने काम करून यापुढे ही उद्दिष्टे प्राप्त करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा
Jaydevi PS/V.Sahajrao /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675643)
Visitor Counter : 1147