आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ चाचण्यांची एकूण संख्या 13.5 कोटींपर्यंत


कोविड चाचण्यांमध्ये वाढ झाल्यामुळे बाधित रुग्ण संख्येच्या दरात सातत्याने घट

Posted On: 25 NOV 2020 1:35PM by PIB Mumbai

 

भारताने कोविड-19 निदान चाचण्यांसाठीच्या सुविधा सातत्याने वाढविल्यामुळे चाचण्यांच्या संख्येत भरभक्कम वाढ झालेली आहे.

गेल्या 24 तासात 11,59,032 चाचण्या झाल्या, आणि एकूण झालेल्या निदान चाचण्यांची संख्या 13.5 कोटींपर्यंत पोचली (13,48,41,307).

सर्वसमावेशक आणि व्यापक स्तरावर कोविड चाचण्या करण्यात येत असल्यामुळे पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे.राष्ट्रीय पातळीवर एकूण पॉझिटिव्हिटी दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे कोविडच्या प्रसाराला आळा बसत आहे. एकूण पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होत असून  हा दर आज 6.84% टक्के इतका आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001QAXJ.jpg

एकूण पॉझिटिव्हिटी दरात होत जाणारी घट ही देशातील कोविड चाचण्यांच्या सुविधांमध्ये व्यापक प्रमाणात वाढ झाल्याचा परिणाम आहे.

आज  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.83% आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002WL2U.jpg

चाचण्यांच्या सुविधेत झालेली सातत्यपूर्ण आणि सुधारित होत गेलेली वाढ चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्यासाठी उपयोगी पडली.  देशात एकूण 2,138 निदान चाचणी केंद्रे आहेत, ज्यात 1167 सरकारी आणि 971 खाजगी चाचणी केंद्रांचा समावेश आहे. दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

परिणामी, भारतातील दर दशलक्षांमागील चाचण्यांची दैनंदिन संख्या ही जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेल्याहून पाच पट जास्त आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003PIU6.jpg

भारताचा एकूण सक्रिय रुग्णसंख्या दर (4,44,746) हा एकूण बाधितांच्या संख्येच्या 4.82% आहे आणि तो सातत्याने 5%हून कमी राहिला आहे.

रिकवरी दर 93% हून जास्त आहे. आज एकूण बाधितांपैकी 93.72% बरे झाले. गेल्या 24 तासात देशात 37,816 जण बरे झाले आणि एकूण रोगमुक्तांची संख्या 86,42,771 वर गेली.

बरे झालेले आणि उपचार घेत असलेल्यांच्या संख्येतील फरक सातत्यांने वाढत असून तो सध्या 81,98,025. आहे.

77.53%   टक्के नवीन बरे झालेले रुग्ण दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये एक दिवसात सर्वाधिक 5,149 रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत, तर त्याखालोखाल दिल्लीत 4,943 रुग्ण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्राने गेल्या 24 तासात बरे झालेल्यांची संख्या 4,086 एवढी नोंदवली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0049ZO6.jpg

गेल्या 24 तासात 44,376 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

76.51%   टक्के नवीन रुग्ण दहा राज्य केंद्रशासित प्रदेशातील आहेत. दिल्लीमध्ये  गेल्या 24 तासात सर्वाधिक 6,224  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,439 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर केरळात काल 5,420 नवीन रुग्णांची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005JQFK.jpg

गेल्या चोवीस तासात या आजारामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 74.22% मृत्यू दहा राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

दिल्लीत सर्वाधिक  109 मृत्यू, पश्चिम बंगालमध्ये 49 तर त्या खालोखाल उत्तर प्रदेशात 33 मृत्यू झाले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0062PLN.jpg

***

U.Ujgare/V.Sahajrao /P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1675568) Visitor Counter : 174