PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 23 NOV 2020 9:15PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 23 नोव्हेंबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबर रोजी, लखनौ विद्यापीठाच्या शतक महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल. 1920 साली या विद्यापीठाची स्थापना झाली होती, आणि यंदा विद्यापीठ आपले शंभरावे वर्ष साजरे करत आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या  (4,43,486) एकूण रुग्ण संख्येच्या 4.85 टक्के असून ती 5 टक्याहून कमी राहण्यावर कायम आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांच्यावर कायम आहे कारण आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी 93.68% रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 41,024 नवीन रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 85,62,624 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्ण संख्ये मधील अंतर निरंतर वाढत आहे आणि सध्या हा आकडा 81,19,155 आहे.

गेल्या 24 तासांत 44,059 लोकांना कोविडची लागण झाली आहे.  भारतात 8 नोव्हेंबरपासून म्हणजेच मागील16 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 77.44% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्र प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये 6,227 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत  6,154 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,060 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोस्टन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंटला डिजिटलपणे संबोधित केले. सर्वांसाठी चांगले उपचार आणि उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देता यावी यासाठी संशोधन करण्याकरिता तज्ज्ञांना एकत्रित आणल्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी बोस्टन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंटचे अभिनंदन करताना, सध्या सुरू असलेल्या महामारीची तुलना आपल्या नागरी संस्कृतीची सध्याची क्षणिक स्थिती आहे अशी केली.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेची त्सुनामीशी तुलना करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक महामारीच्या विरोधातील लढाईत राज्यातील जनतेने निर्धास्त राहू नये, असे आवाहन केले आहे. लोकांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा दाखवू नये आणि मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे या आरोग्यविषयक उपायांचे पालन करणे सुरू ठेवले पाहिजे असे त्यांनी सांगितले. रुग्णांच्या संख्येत घट कायम असताना आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

RT/ST/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675186) Visitor Counter : 147