आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या एकूण रुग्ण संख्येच्या 5 टक्क्याहून कमी


रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांच्यावर कायम

गेल्या 16 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी दैनिक नवीन रुग्णांची नोंद

Posted On: 23 NOV 2020 1:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

 

भारतातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या  (4,43,486) एकूण रुग्ण संख्येच्या 4.85 टक्के असून ती 5 टक्याहून कमी कायम आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांच्यावर कायम आहे कारण आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी 93.68% रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 41,024 नवीन रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 85,62,624 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्ण संख्ये मधील अंतर निरंतर वाढत आहे आणि सध्या हा आकडा 81,19,155 आहे.

गेल्या 24 तासांत 44,059 लोकांना कोविडची लागण झाली आहे.  भारतात 8 नोव्हेंबरपासून म्हणजेच मागील16 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 77.44% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्र प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये 6,227 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत  6,154 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,060 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी 78.74% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील आहते. गेल्या 24 तासात दिल्लीत 6,746 महाराष्ट्रात 5,753 आणि केरळमध्ये 5,254 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

15 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा (6,623) कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 511 मृत्यूंपैकी 74.95% मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 121 , महाराष्ट्रात 50 तर पश्चिम बंगालमध्ये 49  मृत्यूंची नोंद झाली आहे.

21 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा (97) कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

U.Ujgare/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1675037) Visitor Counter : 227