आदिवासी विकास मंत्रालय

ट्राइब्स इंडियाकडून सामाजिकदृष्ट्या परिणामकारक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी अधिकाधिक नवीन उत्पादने बाजारात

Posted On: 23 NOV 2020 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

ट्राइब्स इंडिया आपल्या उत्पादनांना अधिकाधिक  आकर्षक बनवून आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे आणि त्यासोबतच लाखो आदिवासी उपक्रमांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यात मदत करत आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन गेल्या महिन्याभरात, ट्राइब्स इंडियाने बरीच नवीन उत्पादने (मुख्यत: प्रतिकारशक्ती वाढविणारी तसेच वन आणि सेंद्रिय उत्पादने) बाजारपेठेत आणली आहेत. या आठवड्यात, ट्राइब्स इंडियाने या यादीमध्ये आणखी नवीन उत्पादने समाविष्ट केली आहेत. मुख्य आकर्षण म्हणजे गुजरातमधील ग्राम संघटना कंबोडिया अंतर्गत वसावा आदिवासींनी बनविलेले पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, सहेली. संपूर्ण देशभरात या सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यासाठी ट्राइब्स त्यांच्याबरोबर भागीदारी करत आहे.

नवीन उत्पादने नसर्गिक वनोत्पादाने व सेंद्रिय श्रेणी अंतर्गत येतात आणि यापैकी काहींचा उपयोग उत्कृष्ट भेटवस्तू आणि सजावटीसाठी देखील केला जाऊ शकतो.

मागील काही आठवड्यांपूर्वी आणलेली  सर्व नवीन उत्पादने ट्राइब्स इंडिया आउटलेट्स, ट्राइब्स इंडिया मोबाइल व्हॅन आणि तसेच ट्राइब्स इंडिया ई-बाजारपेठ (tribesindia.com) आणि ई-टेलर सारख्या ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहेत.

देशातील विविध भागातून, आज बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये सुरेख कोरीवकाम केलेल्या गणेश आणि लक्ष्मीच्या सुंदर मूर्ती आणि ओडिशातील डोकरा शैलीतील काही सजावटीच्या वस्तू; रोगप्रतिकारक नचेत्ना चूर्ण, गुजरातमधील हर्डा आणि त्रिफळा गोळ्या आणि डेहराडूनच्या मलई मशरूमसह विविध प्रकारचे आणि तामिळनाडू मधील आदिवासींनी तयार केलेळे काही नैसर्गिक बाम (नीलगिरी आणि चंदन) यांचा समवेश आहे. झारखंडमधील आदिवासींकडूनही बेदाणे आणि पेरूच्या जेलीची खरेदी केली आहे.

गो वोकल फॉर लोकल गो ट्रायबल याच मंत्रासोबत संपूर्ण देशातील आदिवासींचे आणि त्यांच्या जीवनाचे हित साधण्याचे काम ट्रायफेड करीत आहे. ट्रायफेडने अलीकडेच भारतातील  सर्वात मोठी हस्तकला आणि सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ असलेली ट्राइब्स इंडिया ई-बाजारपेठ सुरु केली आहे, ही बाजारपेठ 5 लाख आदिवासी उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचे, आदिवासींचे उत्पादन आणि हस्तकलेचे प्रदर्शन भरविण्याचे काम करत आहे जेणेकरून ही उत्पादने देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील.

 

S.Tupe/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675104) Visitor Counter : 210