आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी बोस्टन सेंटर फॉर एक्सलन्स इन हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंटला केले संबोधित


कोविड-19 विषयी हर्ष वर्धन म्हणाले “आपण एका मूक युद्धाच्या काळात जगत आहोत”

योग आणि आयुर्वेद संदर्भात डॉ. हर्ष वर्धन: “आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आणि रोगांवर उत्तम उपाय शोधण्यासठी आधुनिक औषधे आणि भारतीय पारंपारिक प्रणालीने एकत्रित येण्याची वेळ आली आहे"

Posted On: 22 NOV 2020 10:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोस्टन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंटला डिजिटलपणे संबोधित केले.

सर्वांसाठी चांगले उपचार आणि उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देता यावी यासाठी संशोधन करण्याकरिता तज्ज्ञांना एकत्रित आणल्याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी बोस्टन सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंटचे अभिनंदन करताना, सध्या सुरू असलेल्या महामारीची तुलना आपल्या नागरी संस्कृतीची सध्याची क्षणिक स्थिती आहे अशी केली. ते म्हणाले, “आम्ही स्पॅनिश फ्लू, पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध पाहिले नाही. पण आम्ही मूक युद्धाच्या काळात जगत आहोत. 100 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि बर्‍याच घटनांमध्ये, जीवनाच्या शेवटच्या क्षणांमध्ये ते त्यांच्या प्रियजनांना भेटू देखील शकले नाहीत. त्यांचे शेवटचे विधी आणि अंत्यसंस्कार देखील अत्यंत साधेपणाने करावे लागले. आणि जे लाखो लोक जिवंत राहिले आहेत त्यांना देखील अनेक आर्थिक आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

डॉक्टर आणि परीचारीकांशिवाय धोकादायक आणि प्रतिकूल परिस्थिती देखील आपले कर्तव्य चोखपणे  बजावणारे आघाडीचे आरोग्य कर्मचारी जसे चौकीदार, इएमटी, रुग्णवाहिका डॉक्टर यासारख्या आरोग्यसेवा प्रणालीच्या अदृश्य स्तंभांना सलाम करत डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड व्यवस्थापना संदर्भातील भारताच्या रणनीतीची विस्तृत माहिती दिली. 

डॉ. हर्षवर्धन यांनी या संदर्भात सांगितले की, “हे पहिले नाही आणि शेवटचे तर नक्कीच नाही. परंतु हा कोविड 19 लवकरच 21 व्या शतकाचा भूतकाळ असेल. कोविड रुग्णांवरील उपचार पद्धती आता आम्हाला कळली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी आता खूपच कमी लोकांचा मृत्यू होत आहे.  लवकरच लस उपलब्ध होईल आणि पुढील काही महिन्यांत ही यामध्ये लक्षणीय घट दिसून येईल.

एंटीबायोटिक्सपासून ते कठीण काळात घ्यायची काळजी, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि लस या सर्व आधुनिक औषधांच्या सर्व गोष्टींमध्ये भारताने यापूर्वीच प्राविण्य संपादन केले असल्याचे सांगत  मंत्री म्हणाले की आता या प्रणालीची किंमत, गुणवत्ता आणि लोकांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. भारताच्या दुर्गम ग्रामीण भागातील 7,00,000 खेड्यांमधील लोकांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करून भारताने यापूर्वीच रिमोट रोगनिदानकौशल्य (डायग्नोस्टिक्स) आणि उपचारांमध्ये प्रगती केली आहे.

कोविड-19 मुळे कोट्यावधी लोकांना, व्यवसायांना व व्यापार्‍यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले असले तरीदेखील डॉ. हर्ष वर्धन यांनी या काळातदेखील  या संकटाला संधीमध्ये परावर्तीत  करण्याच्या भारताच्या उमेदिकडे लक्ष वेधले:

i.  कारखाने बंद असल्यामुळे प्रदूषण कमी झाले आणि वाहने चालवण्यावर बंदी असल्यामुळे वाहतूक कोंडी होत नव्हती यांचे लोकांनी कौतुक केले आणि भविष्यातही असेच परिणाम मिळवण्यासाठी असे बदल स्वीकारण्यावर जोर दिला आहे.  सर्वसामान्य जनता आता निसर्गाप्रती जागरूक झाली आहे.

ii.  कार्यालयीन काम, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भरणारे वर्ग आता  वीट आणि मातीच्या भिंतींमधून मुक्त झाले आहे. सर्व सीमा मोडून काढत जागतिक समुदायाने यशस्वीरित्या आभासी कार्यालये आणि वर्ग भरवले आहेत.

iii.  आम्ही ज्या क्षमतेने आणि वेगाने लस तयार करत आहोत त्याचा नवीन तंत्रज्ञानावर परिणाम होणार असून नजीकच्या भविष्यात आपल्या सर्वांना जलद गतीने औषध शोधण्यात, खर्च कमी करण्यात आणि आणि गरीब घटकांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात मदत करेल.

iv. या आजारावर औषध शोधण्याचे ज्ञान आम्हाला आमच्या सीमांच्या पुढे जाऊन औषध विकसित करण्यात मदत अँटी-बायोटिक्सला प्रतिसाद न देणाऱ्या अनेक विषाणूजन्य आजारांवर उपाय शोधण्यास सक्षम करतील. या संशोधनात सुपर-बग्सवर उपचार करण्याची क्षमता असू शकते अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.

योग आणि आयुर्वेदा संदर्भात बोलताना ते म्हणाले की भारताने जगाला दिलेली ही भेट आहे. ते म्हणाले, “प्राचीन ज्ञान आणि आरोग्य-व्यवस्थापन प्रणाली हजारो वर्षांपासून निसर्ग उपचारांचा वापर करीत आहे. आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आणि रोगांवर उत्तम उपाय शोधण्यासठी आधुनिक औषधे आणि भारतीय पारंपारिक प्रणालीने एकत्रित येण्याची वेळ आली आहे." त्यानंतर त्यांनी ज्ञान आणि तंत्रज्ञान तज्ञ आणि संशोधकांना भारतात येण्याचे आणि देशातील वैज्ञानिक व तज्ञांसोबत काम करून जगभरातील लोकांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी एक उत्तम सहयोगात्मक व्यासपीठ तयार करण्यासाठी आमंत्रित केले.

****

Jaydevi PS/S.Mhatre /P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674986) Visitor Counter : 129