नागरी उड्डाण मंत्रालय

भारतीय हवाई प्राधिकरणातर्फे (AAI) हवाई सुरक्षा जागृती सप्ताह 2020 चे आयोजन

Posted On: 23 NOV 2020 6:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  23 नोव्हेंबर 2020

भारतीय हवाई प्राधिकरणातर्फे आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत हवाई सुरक्षा जागृती सप्ताह पाळला जात आहे. या साप्ताहिक जनजागृती कार्यक्रमादरम्यान देशभरातील सर्व विमानतळे आणि प्राधिकरणाच्या अखत्यारीतील हवाई दिशादर्शक सेवा केंद्रांवर (ANS) विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

सर्व प्रादेशिक कार्यकारी संचालक आणि विमानतळ संचालकांनी, स्वतःहून पुढाकार घेत, त्यांच्या सबंधित भागात हवाई सुरक्षिततेविषयीच्या उपाययोजना आणि उपक्रमांकडे जातीने लक्ष द्यावे, अशी विनंती प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद सिंह यांनी केली आहे. कोविड-19 च्या काळात विमानांची वाहतूक कमी झाल्यानंतर, अनेक विमानतळांवर प्राणी/पक्ष्यांचा वावर वाढल्याचे आढळले आहे. त्यामुळे विमानांची संख्या कमी असली तरीही, सुरक्षिततेविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

हवाई सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी एएआय आपल्या कर्मचाऱ्यांसोबत विविध कार्यक्रम करणार आहे. यात कागदपत्रे आणि सुविधांचा आढावा, मॉक ड्रील, प्रतिबंधात्मक उपाययोजना इत्यादींचा समावेश होईल. सोशल मिडीयावरुन विविध जनजागृतीपार मोहिमा चालवल्या जातील. त्याशिवाय, एएआयच्या कार्यालयाबाहेर बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्याशिवाय, सुरक्षा जागृती सप्ताहाविषयी विमानतळ प्राधिकरणाशी सबंधित अंतर्गत आणि बाह्य हितसंबंधी गटांच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नागरी हवाई महासंचालानालय-डीजीसीए चे डीडीजी, यांनी 2030 पर्यंत शून्य मृत्यूदराचे दीर्घकालीन लक्ष्य ठेवण्यावर भर दिला. जागतिक नागरी विमान वाहतूक सुरक्षितता योजनेनुसार, सुरक्षा व्यवस्थांचे योग्य व्यवस्थापन करुन, हे उद्दिष्ट गाठता येऊ शकतं.

स्थानिक विमानतळांवर, विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विमानतळांवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना, आसपासच्या परिसरातील नागरिकांना, सुरक्षाविषयक नियमांची जाणीव आणि माहिती करुन देण्यासाठी, विमानतळ संचालक, या सप्ताहादरम्यान आजूबाजूचे भाग तसेच शाळा/महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करणार आहेत.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675117) Visitor Counter : 171