PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 13 NOV 2020 8:10PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 13 नोव्हेंबर 2020

 

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे दोन प्रमुख राष्ट्रीय आयुर्वेद संस्था राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त गुजरातच्या जामनगर येथील आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था-ITRA आणि राजस्थानच्या जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- NIA पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्राला समर्पित केल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या जेएनयु म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. यावेळी जेएनयु चे विद्यार्थी आणि देशातल्या युवाशक्तीशी त्यांनी संवाद साधला.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारताताली सक्रिय रुग्ण संख्या 5 लाखांहून कमी असून, ती आज 4,85,547 इतकी आहे. पाच लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्या असण्याचा हा आजचा तिसरा दिवस आहे. एकूण बाधित संख्येत त्यांचा वाटा 5.55 % आहे.

नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे  हे शक्य झाले आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

एकूण 44,879 नवीन नोंदविलेल्या रुग्णसंख्येच्या  तुलनेत  गेल्या 24 तासांत 49,079 रुग्ण बरे झाले आहेत, नवीन रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक हा  भारतातील कल सलग 41 व्या दिवशी कायम आहे.

देशात बरे झालेली एकूण  रुग्णसंख्या 81,15,580 तर   बरे झालेला  रुग्णदर 92.97%  इतका आहे. बरे झालेली रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या यातील फरक सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो  76,31,033 इतका  आहे.

बरे झालेल्या रुग्णसंख्येपैकी  77.83 %  संख्या ही 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेश यामधील असल्याचे लक्षात आले आहे.

एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 7,809 नव्याने बरे झालेल्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 16,05,064 वर गेली आहे.

नवीन रुग्णांपैकी  76.25 %  रुग्ण 10  राज्ये / केंद्रशासित प्रदेश यामधील असल्याचे लक्षात आले आहे.

दिल्ली येथे दैनंदिन नव्या आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासात 7,503 इतकी होती. केरळ येथे 5,537 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रात 4,496 इतकी नव्या रुग्णांची नोंद काल करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये साधारण 80 % (79.34 %) अर्थात  547  मृत्यूंची नोंदवण्यात आले आहेत.

यापैकी 22.3 % मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे, जिथे 122 मृत्यू झाले आहेत. दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे अनुक्रमे 104 आणि 54 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

 

इतर अपडेट्स:

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने (एचएलसी) या वर्षभरात चक्रीवादळ/पूर/ दरड कोसळलेल्या घटनांमध्ये बाधित झालेल्या सहा राज्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत अतिरिक्त केंद्रिय मदत मंजूर केली आहे. उच्चस्तरीय समितीने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) यांच्याकडून 4,381.88 कोटी रुपयांचा अतिरिक्त केंद्रिय मदत निधी मंजूर केला आहे.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री  निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र 12 प्रमुख उपायांची घोषणा केली आहे. यात 2.65 लाख कोटी  रुपयांचे प्रोत्साहनपर उपाय जाहीर करण्यात आले. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सीतारामन  यांनी माहिती दिली की कोविड --19 महामारीचा सामना करण्यासाठी वाढीव मदत करण्यासाठी आतापर्यंत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने 29.87 लाख कोटी रुपयांचे एकूण प्रोत्साहन जाहीर केले आहे. जे  राष्ट्रीय जीडीपीच्या (एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या) 15 टक्के आहे. यापैकी जीडीपीच्या 9  टक्के केंद्र  सरकारने दिले आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश आणि झारखंड या सहा राज्यातील 116 जिल्ह्यांमधल्या तीन लाख स्थलांतरित मजूरांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश, ग्रामीण जनता आणि स्थलांतरित मजूरांना अधिकाधिक सक्षम करणे हा आहे.

‘वागीर’ या  प्रोजेक्ट-75 श्रेणीतील पाचव्या स्कॉर्पिन पाणबुडीचा  विजया श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतील  माझगाव गोदीत  एका कार्यक्रमात जलावतरण झाले. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री  श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

महाराष्ट्र अपडेट्स:

शिक्षक आणि शालेय कर्मचार्‍यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने रेल्वेला केली आहे. महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना 50 टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यानंतरची ही विनंती करण्यात आली आहे. कोविड-19 प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ नसल्यास, दिवाळीच्या सणानंतर सुमारे पंधरा दिवसात मुंबईच्या लोकल रेल्वेगाडय़ा सर्व प्रवाशांसाठी सुरू होऊ शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कोविड -19 प्रकरणांवर दोन आठवडे दररोज बारीक लक्ष ठेवले जाईल आणि त्यानंतर लोकल गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

 

FACT CHECK

 

 

Image

 

S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672749) Visitor Counter : 164