कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
स्कील इंडियाच्या वतीने गरीब कल्याण रोजगार योजनेअंतर्गत, सहा राज्यांतल्या 116 जिल्ह्यांतील तीन लाख स्थलांतरित मजुरांना कौशल्य प्रशिक्षण
Posted On:
12 NOV 2020 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2020
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना-2016-2020 च्या केंद्र सरकार पुरस्कृत आणि केंद्र व्यवस्थापित कार्यक्रमाअंतर्गत मागणी-अनुकूल कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम.
- सहा राज्यांतल्या 116 जिल्ह्यांमध्ये 200 पेक्षा अधिक प्रशिक्षण भागीदार हे प्रशिक्षण देत आहेत.
पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानाअंतर्गत, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश आणि झारखंड या सहा राज्यातील 116 जिल्ह्यांमधल्या तीन लाख स्थलांतरित मजूरांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश, ग्रामीण जनता आणि स्थलांतरित मजूरांना अधिकाधिक सक्षम करणे हा आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना-2016-2020 च्या केंद्र सरकार पुरस्कृत आणि केंद्र व्यवस्थापित कार्यक्रमाअंतर्गत हे मागणी-अनुकूल कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.संबंधित जिल्ह्याधिकारी/ न्यायदंडाधिकारी/ उपायुक्त यांच्या मदतीने एमएसडीईकडून या सर्व जिल्ह्यात 125 दिवसांचे हे कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.काही भागात हे प्रशिक्षण आधीच सुरु झाले आहे आणि इतर ठिकाणी महिनाभरात हे सुरु केले जाणार आहे.
एमएसडीसी च्या अधिपत्याखालील राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे प्रशिक्षण देत आहेत. PMKVY 2016-20 किंवा राज्यातील योजनांअंतर्गत हे प्रशिक्षण दिले जात आहे.
या अंतर्गत 1.5 लाख स्थलांतरित मजुरांना हे अल्पकालीन प्रशिक्षण दिले जात असून त्यांना याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.या सर्व भागात, रोजगारासाठी आवश्यक असलेले कौशल्य देणे तसेच, वेगवगेळ्या भागातून आलेल्या मजुरांना एकत्र करण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे.
स्थानिक रोजगाराच्या मागण्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सल्ल्यानुसार, कौशल्य विकास मंत्रालय हे प्रशिक्षण देते.
ग्रामीण विकासासाठी कौशल्य आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, यावर भर देत, केंद्रीय कौशल्य विकास मंत्री डॉ नरेंद्र नाथ पांडेय म्हणाले, की “कौशल्य सक्षमीकरणातून ग्रामीण विकास हा स्कील इंडिया अभियानाचा पाया आहे. कारण, देशातली 70 टक्के श्रमशक्ती ग्रामीण भारतातून येते. देशातील उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार, प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केले जात आहेत. आपल्याला उद्योग-पूरक श्रमशक्ती तयार करायची आहे. या कौशल्य विकासातून शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. कारण श्रमिकांची एक एकत्रित उर्जा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे पांडेय म्हणाले.”
स्कील इंडिया पोर्टलवर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि कंपन्यांनी नोंदणी केल्यावर आणि त्यांना मान्यता मिळाल्यावर हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला. या सहा राज्यांत ज्या नोकऱ्यांची गरज आहे, अशा नोकऱ्या जसे की इलेक्ट्रिशियन, टेलर, किरकोळ विक्रेते, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, शिलाई मशीन दुरुस्त करणे अशाप्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. PMKVY अंतर्गत पात्र उमेदवारांना या प्रशिक्षणासाठी आवश्यक तो खर्च थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात आहे.
PMKVY या पथदर्शी योजनेचा उद्देश, शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये शिकवून आपल्या पायावर उभे करणे हा आहे.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672376)
Visitor Counter : 235