संरक्षण मंत्रालय
प्रोजेक्ट -75 श्रेणीतील पाचवी स्कॉर्पेन पाणबुडी - ‘वागीर’चे आज माझगाव गोदीत जलावतरण
वागीरच्या जलावतरणामुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या अनुषंगाने भारताने पाणबुडी निर्मिती राष्ट्र म्हणून आपले स्थान बळकट केले
Posted On:
12 NOV 2020 9:35PM by PIB Mumbai
मुंबई, 12 नोव्हेंबर 2020
‘वागीर’ या प्रोजेक्ट-75 श्रेणीतील पाचव्या स्कॉर्पिन पाणबुडीचा विजया श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतील आज माझगाव गोदीत एका कार्यक्रमात जलावतरण झाले. याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पश्चिमी नौदल कमांड चे प्रमुख - व्हाइस ऍडमिरल आर.बी. पंडित, एमडीएल अर्थात माझगाव डॉक लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक-व्हाइस ऍडमिरल नारायण प्रसाद आणि एमडीएलचे अन्य संचालक या सोहळ्याला उपस्थित होते.
वागीरच्या जलावतरणामुळे भारताने पाणबुडी निर्मिती राष्ट्र म्हणून आपले स्थान बळकट केले आहे. एमडीएल ने युद्धनौका आणि पाणबुडी निर्मिती कंपनी म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. सरकारच्या सध्याच्या मेक इन इंडिया 'आणि' आत्मनिर्भर भारत '.ला चालना देण्याच्या संकल्पनेशी हे सुसंगत आहे.
प्रोजेक्ट-75 च्या स्कॉर्पिन पाणबुडी प्रकल्पातील सहा पैकी आयएनएस कलवरी आणि खान्देरी या दोन पाणबुड्या याआधीच नौदलात दाखल झाल्या असून उर्वरित दोन पाणबुड्यांच्या समुद्रातील चाचण्या सुरू आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672438)
Visitor Counter : 309