PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
05 NOV 2020 7:53PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 5 नोव्हेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
सक्रिय रुग्णांच्या संख्येतील घसरणीचा कल भारताने कायम राखला आहे. आज सलग सातव्या दिवशी, उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाखांहून कमी नोंदली गेली असून 5,27,962 इतकी आहे देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे प्रमाण केवळ 6.31% एवढेच आहे.
राष्ट्रीय कल कायम ठेवत 27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता 20,000 पेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्णांच्या 78% रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि प. बंगालमध्ये एकूण सक्रिय रुग्णांपैकी 51% पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोविड बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77,11,809 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर सुमारे 72 लाख (71,83,847) इतके आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 92.20% झाला आहे. गेल्या 24 तासात 55,331 कोविड रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 50,210 नव्या रुग्णांची नोंद झाली.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 82% रुग्ण 10 राज्ये /केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्ये एका दिवसात 8 हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांपैकी 45% हून अधिक रुग्ण या तीन राज्यांमध्ये आहेत.
गेल्या 24 तासात 50,210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळ मध्ये काल एका दिवसात सर्वाधिक म्हणजेच 8,000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले, त्याखालोखाल दिल्लीत 6000 पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 704 मृत्यूंची नोंद झाली. यापैकी सुमारे 80% मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. नवीन मृत्यूंपैकी 42% हून अधिक एकट्या महाराष्ट्रातील (300 )आहेत.
इतर अपडेट्स:
- पॅरिस कराराअंतर्गत भारताने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात भारत एक पाऊल पुढेच असून भारत आपल्या राष्ट्रीय कटिबद्धतेच्या योगदानानुसार (NDC’s) उद्दिष्टपूर्ती करत आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. हवामान बदलाचा सामना करताना जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सियस पर्यंत रोखण्यासाठीच्या यशस्वी उपाययोजना करणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असे जावडेकर यांनी सांगितले.
- केंद्र सरकारने भारतातील दूरचित्रवाणी रेटिंग एजन्सीविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीशेखर वेम्पत्ती यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत चार सदस्य आहेत. यात डॉ शलभ, सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक, गणित आणि सांख्यिकी विभाग,आयआयटी कानपूर, डॉ राजकुमार उपाध्याय, कार्यकारी संचालक, सी-डॉट आणि प्रा. पुलक घोष, सार्वजनिक धोरणविषयक केंद्र, अशी या सदस्यांची नावे आहेत.
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील बांबू संसाधनांचा अधिक व्यापक उपयोग करण्याचे आवाहन केले. वेबिनारमध्ये आज आभासी बांबू प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते म्हणाले की इमारती आणि अंतर्गत सजावट, हस्तकला, अगरबत्ती बनवणे, कपडे , जैव-इंधन संसाधन इत्यादी विविध क्षेत्रात बांबूचा विविध प्रकारे उपयोग केला जातो.
- खादीच्या ऑनलाईन विक्रीमुळे या दिवाळीत कुंभार समुदायाला चांगला लाभ झाला आहे. राजस्थानमधील जैसलमेर आणि हनुमानगढ यासारख्या दुरस्थ जिल्ह्यातील कुंभारांनी बनवलेले दिवे खादी इंडियाच्या ई-पोर्टलमुळे देशभर पोहचले आहेत.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्र सरकारने 50 टक्के क्षमतेसह सिनेमा हॉल आणि थिएटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोविड महामारी दरम्यान कोणतेही मोठे सिनेमे प्रदर्शित होणार नसल्यामुळे सिनेमागृहांच्या व्यवसायाची आशा धूसर दिसत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा दर 90.68% नोंदविला गेला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 1.12 लाखांवर आली आहे.
M.Chopade/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670425)
Visitor Counter : 168