सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योगच्या ई-पोर्टलचा कुंभार समुदायाला दिवाळीच्या सणात लाभ
Posted On:
05 NOV 2020 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020
खादीच्या ऑनलाईन विक्रीमुळे या दिवाळीत कुंभार समुदायाला चांगला लाभ झाला आहे. राजस्थानमधील जैसलमेर आणि हनुमानगढ यासारख्या दुरस्थ जिल्ह्यातील कुंभारांनी बनवलेले दिवे खादी इंडियाच्या ई-पोर्टलमुळे देशभर पोहचले आहेत.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या व्होकल फॉर लोकल घोषणेनुसार यावर्षी प्रथमच दिव्यांची ऑनलाईन आणि स्टोअर्समधून विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. केव्हीआयसीने 8 ऑक्टोबर रोजी दिव्यांच्या ऑनलाईन विक्रीस सुरुवात केली आणि एका महिन्याच्या आत 10,000 दिव्यांची ऑनलाईन विक्री झाली. मातीच्या दिव्यांना जास्त मागणी आहे, अगदी 10 दिवसांत बहुतांश आकर्षक दिवे विकून झाले.
यानंतर केव्हीआयसीने दिव्यांची नवीन डिझाईन सुरु केली, त्यालाही प्रचंड मागणी आहे. दिवाळी जवळ येत आहे, तशी दिव्यांच्या विक्रीत वाढ होत आहे.
केव्हीआयसीने 8 प्रकारच्या दिव्यांचा संच विक्रीस ठेवला आहे, यात 84 आणि 108 रुपये यादरम्यान 12 दिव्यांचा संच विक्रीसाठी उपलब्ध आहे. केव्हीआयसी कुंभारांनी प्रत्येक दिव्यामागे 2 ते 3 रुपयांची कमाई होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. खादी इंडियावर दिवे www.khadiindia.gov.in.या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की, मातीच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री ही खऱ्या अर्थाने केव्हीआयसी कुंभारांचे सक्षमीकरण होय. पूर्वी कुंभारांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री त्या-त्या भागापुरती मर्यादीत होती, पण खादीच्या ई-पोर्टलची देशभर पोहोच असल्यामुळे ही उत्पादने आता देशभर विकली जात आहेत.
केव्हीआयसीने कुंभारांना इलेक्ट्रीक चक्र आणि इतर उपकरणांचे कुंभार सशक्तीकरण योजनेअतंर्गत प्रशिक्षण दिले आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पन्नात 5 पटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत, केव्हीआयसीने 18,000 इलेक्ट्रीक चक्र वितरीत केली आहेत, ज्याचा 80,000 पेक्षा अधिक कुंभारांना लाभ झाला आहे.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670384)
Visitor Counter : 183